24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeपरभणीपाण्याच्या शोधात हरणाने गमावला जीव

पाण्याच्या शोधात हरणाने गमावला जीव

एकमत ऑनलाईन

चारठाणा/प्रतिनिधी
वाढत्या तापमान व पाणी टंचाईचा सामना वन्यप्राण्यांनाही करावा लागत आहे. चारठाणा परिसरातील नदी नाले, छोटे मोठे तलाव कोरडे झाल्यामुळे वन्यप्राणी सैरभैर भटकंती करीत आहेत. पाण्याच्या शोधात चारठाणा येथील शेत शिवारात पुन्हा एका हरणांचा मृत्यू झाल्याची घटना दोन तिन दिवसापूर्वी घडली असावी. त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली होती. ही घटना १६ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास समोर आली आहे. आठवडाभरात चारठाणा परिसरात घडलेली ही दुसरी घटना असून वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्याची मागणी वाढली आहे.

उन्हाची तीव्रता वाढताच शेत शिवारात पाणवठे कोरडे पडत आहेत. या भागात कृत्रिम पाणवठे नसल्यामुळे वन्यप्राण्यांची भटकंती सुरू आहे. सद्यस्थितीत पाण्याची पातळी घटली आहे. चारठाणा येथील शिवारात १६ एप्रिल शनिवार रोजी येथिल शेतकरी नारायन मुजमुले यांच्या शेतात त्यांचा मुलगा रमेश मुजमुले हा फेरफटका मारण्यासाठी गेला आसतांना हरिण तिन- चार दिवसापूर्वी विहीरित पडुन मृत्यू होऊन दुर्गंधी पसल्याचे समोर आले. सदर माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रभाकर कुर्हे, पत्रकार रंगनाथ गडदे यांना कळवताच प्राणीमित्र संदिप देशमुख यांना सोबत घेऊन घटनास्थळी भेट देउन सदर माहीती वन विभागाचे वनपाल घुगे यांना दुरध्वनी वरुन देण्यात आली होती.

रात्री उशिरापर्यंत कोणतेही कर्मचारी येथे पोहचले नव्हते. पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाचा विहीरीत पडुन मृत्यू झाल्याची घटणा घडली असावी. या परिसरात पाण्यासाठी व चा-यासाठी हरणांचे कळप फिरतात. गेल्या आठवड्यात जिंतूर तालुक्यात पाण्याच्या शोधात निलगायी विहिरीत पडल्याची घटना घडली होती. नैसर्गिक पाणीसाठ्यात दीर्घकाळ पाणी टिकते माञ पाण्याचा उपसा होत आसल्याने वन्य प्राण्यासाठी पाणी टंचाई निर्माण होते. दरम्यान, तीव्र पाणी टंचाई लक्षात घेऊन लवकरच पाणवठे निर्माण करण्याची मागणी शेतकरी व प्राणीमित्रांकडुन वाढली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या