16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeपरभणीपूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उपसा, प्रशासनाचे दुर्लक्ष

पूर्णा नदीपात्रातून अवैध रेती उपसा, प्रशासनाचे दुर्लक्ष

एकमत ऑनलाईन

परभणी : तालुक्यातून वाहणा-या पुर्णा नदीपात्रातून दिवसरात्र अवैध रित्या रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येत असुन प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांतून नाराजीचा सुर उमटत आहे.

पुर्णा नदीपात्रातुन गेल्या अनेक दिवसापासुन रेती तस्करांनी उच्छाद मांडला आहे. दिवस-रात्र नदी पात्रातून ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा केला जात आहे. नदी काठावरच रेतीचे साठे जमा करून हायवा, ट्रकद्वारे ही रेती परभणी शहरासह परिसरात चढ्या दराने विक्री केल्या जात असतांनाही प्रशासनाकडून मात्र यावर कुठलीही कारवाई केली जात नसल्याचे समजते. यामुळेच हे रेती तस्कर खुलेआम रेतीचा उपसा करीत असल्याची चर्चा होत आहे.

पुर्णा नदीच्या काठावरील सावंगी, संबर, जोडपरळी तसेच दुधना नदीपात्रातून झरी, मांडवा, जवळा या परिसरातुनही मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करण्यात येत आहे. ग्रामीण भागात आधीच रस्त्याची वाताहत झाली असून या रेतीच्या वाहनामुळे त्यात आणखी भरत पडतांना दिसत आहे. प्रशासनाने अवैध रित्या होत असलेल्या वाळू उपशावर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या