ताडकळस : येथुन जवळच असलेल्या फुलकळस येथील रहिवासी गणेश विश्वनाथ घोडेकर (वय ६५) यांनी त्यांच्या माखणी शिवारात बुधवार, दिÞ७ डिसेंबर रोजी दुपारी १२च्या सुमारास शेतातील झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शेतकरी घोडेकर हे काही दिवसापासून शेतीसाठी घेतलेल्या बँकेच्या कर्जामुळेचिंतेत होतेÞ यातून त्यांनी माखणी शिवारातील त्यांच्या शेतात मधील झाडास दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केलीÞ
या घटनेची फिर्याद ताडकळस पोलीस ठाण्यात त्यांचा मुलगा गंगाधर घोडेकर यांनी दिलीÞ या फिर्यादीवरून ताडकळस पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहेÞ या घटनेचा पुढील तपास ताडकळस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ.गणेश लोंढे व रामकिसन काळे करत आहेतÞ त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.