ताडकळस : येथून जवळच असलेल्या फुलकळस येथे भाजपाच्या वतीने बूथ क्र.६५ शिवकुमार शिराळे, बुथ क्र.६३ राम कोळेकर, बुथ क्र.६४ पांडूरंग मोरताटे फुलकळस शक्ती यांची बुथ अध्यक्ष म्हणून तर केंद्र विस्तारक म्हणून भिमाशंकर शिराळे (ग्रामपंचायत सदस्य फुलकळस) यांची निवड करण्यात आली.
फुलकळस येथे दि.१८ मार्च रोजी बूथ सशक्तीकरण अभियान अंतर्गत बैठक घेण्यात आली. बैठकीची सूरूवात जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी फुलकळस मधील तीन बूथ वरील सर्व पदाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली.
या प्रसंगी डॉ.सुभाष कदम (जिल्हाध्यक्ष भाजपा ग्रामिण), माधवराव चव्हाण (जिल्हा उपाध्यक्ष भाजपा परभणी), बालाजी रुद्रवार (जिल्हा उपाध्यक्ष भाजपा परभणी), शिवदास शिराळे, हारी पाटील मीसाळ, शिवाजीराव चौधरी, शिवाजीराव आंबोरे उपस्थित होते.
यावेळी लक्ष्मणराव शिराळे, शिंदे मामा, मारोतराव शिराळे, शिवकुमार शिराळे, दत्ता पाटील, बालाजी शिंदे, विनायक गलांडे, ज्ञानोबा जगाडे, बसवेश्वर वरवटे, नवनाथ घोडेकर, हनुमंत मिसाळ, साहेबराव रहाटकर, काशिनाथ शिराळे, उमाजी गलांडे, गजानन गलांडे, सुभाल शिराळे, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक यशस्वी करण्यासाठी भाजपाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.