जिंतूर : जिंतूर- बलसा रस्त्यावर दि.१६ फेब्रुवारी गुरुवारी संध्याकाळी ६़३०वाजताच्या सुमारास दुचाकी अपघातात दुचाकी स्वार व पायी चालणारा एक व्यक्ती गंभीर जखमी झाला़ त्यांना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या प्रकरणी बातमी देईपर्यंत पोलिसांत गुन्हा नोंद झाला नव्हता.
जिंतूर- बलसा रोडवर बलसा दर्गा शरीफ दर्शनासाठी जाणारे अहेमद खान गुलदीन खान (वय ४५ वर्ष) हे जात असताना दुचाकीस्वार प्रकाश शहाजी पाटील हे त्यांच्या दुचाकी क्रमांक एमएच २२ इएल ५५६९ या वरून पाचेगाव येथे जात असताना बलासा रोडवरील पहिल्या पुलाजवळ सदर अपघात झाला.
या अपघातात जखमी झालेल्या दोन्ही जखमींना ग्रामस्थांनी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता़ या ठिकाणी डॉ.कोठगीरे, बालाजी नेटके आदींनी प्राथमिक उपचार करून प्रकृती खालवत असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे़ या अपघातानंतर नागरीकांची मोठी गर्दी जमा झाली होती.