24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeपरभणीभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निघणार आज भव्य मिरवणूक

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निघणार आज भव्य मिरवणूक

एकमत ऑनलाईन

परभणी/प्रतिनिधी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने परभणी शहरासह जिल्ह्यातील विविध पक्ष, संस्था, संघटना, प्रतिष्ठानांद्वारे उद्या गुरुवार, दि.१४ एप्रिल रोजी अभिवादनासह समाजोपयोगी, स्पर्धात्मक, मनोरंजनात्मक असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून भव्यदिव्य मिरवणूकही निघणार आहे.

गेल्या दोन वर्षांत कोरोनाच्या आपत्तीने, निर्बंधाने जयंती मंडळांना साधेपणाने जयंती साजरी करावी लागली. यावेळी मात्र निर्बंधमुक्त जयंती सोहळा होणार आहे. त्यानिमित्ताने शहरासह जिल्ह्यात विविध पक्ष, संस्था, संघटना, प्रतिष्ठाने व मंडळ, उत्सव समित्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भरगच्च असे कार्यक्रम आयोजित केले आहेत. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी परभणीतील स्टेशन रस्त्यावरील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर सकाळच्या सत्रात बुध्द वंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या पाठोपाठ विविध भागात जयंती निमित्ताने अन्य उपक्रम व कार्यक्रम साजरे होणार आहेत. या अनुषंगाने संपूर्ण शहरात चोहोबाजूंनी मोठ्या प्रमाणावर होर्डींग्ज, झेंडे, पताके लावण्यात आले आहेत. संपूर्ण शहर जयंतीच्या निमित्ताने सजले आहे.

जयंतीच्या निमित्ताने सायंकाळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक निघणार असून दरवर्षीप्रमाणे मुख्य बाजारपेठेतून ही मिरवणूक डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूणार्कृती पुतळ्यापर्यंत असणार आहे. या ठिकाणी मिरवणूकीचे विसर्जन होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर विविध संस्था, संघटना, प्रतिष्ठाने, उत्सव समित्यांनी या मिरवणूकीत काही उत्तम देखावे, समाजोपयोगी उपक्रम किंवा संदेश दिले जावेत, या दृष्टीने भक्कम तयारी केली आहे.

दरम्यान, शहर वाहतूक पोलिस यंत्रणेने मिरवणूक सुरळीत पार पडावी म्हणून मिरवणूक मार्गावरील रस्ते वाहतूक पूर्णत: बंद करीत अन्यत्र वळविली आहे. तर महापालिकेने काही ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम केले आहे. त्यामुळे जयंती साजरी करण्यासाठी शहरात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या