ताडकळस : येथुन जवळच असलेल्या महातपुरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दि. १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे ऐवजी मातृ पितृ पूजन दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी भगवंत देसाई देशपांडे जेष्ठ नेते भाजपा, ग्रामपंचायत खांबेगाव व महातपुरीच्या आदर्श सरपंच सौ.मुक्ताताई कदम, प्रमुख पाहुणे म्हणून गजानन कदम पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी युवक तालुका, उपसरपंच सौ.ईंदुमती एडके उपस्थित होते.
संपूर्ण गावातील महिला व पुरुष, आजी-आजोबा सपत्नीक उपस्थित होते.
शाळेतील विद्यार्थ्यांनी आई-वडील, आजी-आजोबा यांची पाद्यपूजा करून पुष्पमाला अर्पण केल्या. पेढा भरवित आरती केली आई वडिलांना पाच प्रदक्षिणा घालून साष्टांग वंदन घातले. आई-वडिलांनी भरभरून मुलांना आशीर्वाद दिले. या अनोख्या कार्यक्रमाने सर्व माता, पालक यांचे हृदय भरून आले. नंतर पालकांनी विद्यार्थ्यांना हार घालून पेढा भरवला व त्यांना भावी उज्वल आयुष्यासाठी
भरभरून आशीर्वाद दिले. या कार्यक्रमाचे आयोजन आदर्श शिक्षक विष्णुपंत परडे गुरुजी कळगावकर यांनी केले. यशस्वीतेसाठी शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्याम कस्तुरे, उपाध्यक्षा सौ.निशा सोनकांबळे, माधवराव एडके, शेषेराव मोहीते, दिलीपराव जंगाले, कुंडलिक सोनकांबळे, पिराजी कस्तुरे, किरण कस्तुरे, रमजान शेख, बालाजी मोहिते आंिदनी परिश्रम घेतले.