24.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीमहामानवास अभिवादनासाठी उसळली गर्दी

महामानवास अभिवादनासाठी उसळली गर्दी

एकमत ऑनलाईन

परभणी : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्ताने शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास गुरूवार, दि.१४ एप्रिल रोजी विविध पक्ष, संघटना व नागरिकांनी पुष्पहार अर्पण करीत विनम्र अभिवादन केले. तसेच परभणी शहरात सकाळच्या सुमारास झालेल्या सामुहीक वंदनेसाठी मोठ्या प्रमाणावर नागरीकांनी गर्दी केली होती. जिल्ह्यातील शहरी व ग्रामिण भागातही विविध सामाजिक उपक्रमांद्वारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

शासनाने सर्व निर्बंध उठवल्यामुळे परभणी जिल्ह्यात या वर्षी जयंती अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. परभणी शहरातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी अनुयायासह, लोकप्रतिनिधी, अधिकारी, राजकीय नेते यांच्यासह नागरीकांनी गर्दी केली होती. जयंती निमित्त गुरूवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या प्रार्थनेनंतर उपस्थितांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती. यावेळी जिल्हाधिकारी आंचल गोयल., आ.डॉ.राहुल पाटील, मनपा आयुक्त देविदास पवार, महापौर अनिता सोनकांबळे, उपमहापौर भगवान वाघमारे, काँग्रेस अनुसूचित जाती जमाती विभाग प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबीरे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध पक्षाचे नगरसेवक, राजकीय नेते यांनी अभिवादन केले. विविध पक्ष, संघटनेच्या वतीने जयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम देखील राबविण्यात आले. जयंतीनिमित्ताने शहरात मोफत आरोग्य तपासणी, व्याख्यान, भीमगीत संगीत रजनी यासह सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांना नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे जयंती निमित्त निघालेल्या भव्य दिव्य मिरणुकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान जयंतीनिमित्त शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या