31.3 C
Latur
Tuesday, May 30, 2023
Homeपरभणीमहिला टेबल टेनिस स्पर्धेत आद्या बाहेतीस दुहेरी मुकुट

महिला टेबल टेनिस स्पर्धेत आद्या बाहेतीस दुहेरी मुकुट

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणीतील खेलो इंडिया सेंटरमधील टेबल टेनिस स्पर्धेला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत ११ वर्षे आतील गटात मुलीत : काव्या केंद्रेकर (प्रथम), शार्वी देशपांडे (द्वितीय), समृध्दी नंदापुरकर (तृतीय), अनुष्का मेड (तृतीय) यांनी तर १३ वर्षे आतील मुलीत आद्या बाहेती (प्रथम), ओवी बाहेती (द्वितीय), काव्या केंद्रेकर, शांभवी खडके (तृतीय), महिला गटात : आद्या बाहेती प्रथम, सायली जाधव द्वितीय, ओवी बाहेती, श्रावणी मोगरकर तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेतील यशस्वी खेळाडूंना स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

भारतीय खेल प्राधिकरण व महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार महिला दिनानिमित्त १० ते २५ मार्च दरम्यान भारतातील सर्व खेलो इंडिया केंद्रावर महिलांच्या स्पर्धा घेऊन महिलांचे खेळास प्रोत्साहन मिळून त्यांचा खेळातील सहभाग वाढावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने दस का दम अंतर्गत प्रयत्न करण्यात येत आहेत.

यानिमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी येथील खेलो इंडिया सेंटरमध्ये टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन १९ ते २० मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला महिला खेळाडूचा सहभाग चांगला लाभला.

स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.पूजा महेश बाहेती यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी गणेश माळवे परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव , संजय मुंडे राज्य क्रीडा मार्गदर्शक जिल्हा क्रीडा संघटना परभणी, धंनजय भागवत जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक संघ उपस्थित होते. या स्पर्धा अतिशय उत्साहाच्या वातावरणात यशस्वी रीतीने पार पडली.

स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी राष्ट्रीय खेळाडू श्रेया फुरसुले, गौस खान पठाण यांची उपस्थित होती. स्पर्धा यशस्वीतेसाठी खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षक : चेतन मुक्तावार, अजिंक्य घन, विजय अवचार, निखिल झुटे, रोहीत जोशी, तुषार जाधव, सुरज भुजबळ आदींनी परीश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या