परभणी : येथील श्रीमती रुक्मिणीबाई प्रतिष्ठान परभणी संचलित मुक्ताई प्रि स्कूलच्या चिमुकल्यांनी स्रेहसंमेलनात आपल्या उत्कृष्ट कलेची छाप पाडत उपस्थितांची मने ंिजकली. मुक्ताई प्री स्कुलचे हे सातवे स्रेहसंमेलन होतÞ या स्रेहसंमेलनात नर्सरी ते केजी पर्यंतचे विद्यार्थी आहेतÞ या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, लोकगीते, महाराष्ट्राची लाडकी लावणी, चित्रपटातील गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केलेÞ
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर पाचमासे केंद्रप्रमुख दैठणा होतेÞ प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार तथा व्हाईस ऑफ मीडिया परभणीचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, व्यंकटेशराव वानखेडे शिक्षक – बाल विद्या मंदिर, संस्थापक अध्यक्ष वामनराव सूर्यवंशी, संस्था सचिव श्रीमती कलावतीबाई जाधव, प्रा.वर्षा देशमुख, प्रा.भारत देशमुख, मुख्याध्यापिका नंदाताई भालेराव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुकूंद गरुड यांनी तर सूत्रसंचालन तुकाराम गरुड यांनी केले. आभार प्रदर्शन शिल्पा पांचाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका मनीषा जैन, संगीता भराड यांनी प्रयत्न केले.
मुक्ताई प्रि स्कुलच्या बाल कलाकारांनी ंिजकली उपस्थितांची मने
एकमत ऑनलाईन