29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeपरभणीमुख्याध्यापकाने केला शिक्षिकेचा विनयभंग

मुख्याध्यापकाने केला शिक्षिकेचा विनयभंग

एकमत ऑनलाईन

पूर्णा: तालुक्यातील धगनर टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गात एकट्या असलेल्या शिक्षीकेचा मुख्याध्यापकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. तसेच मुख्याध्यापकाने शिक्षीकेला केस धरून मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार चुडावा पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. या प्रकरणी मुख्याध्यापकावर विनयभंगासह अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट प्रमाणे चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत चुडावा पोलीसांकडून मिळालेल्या माहिती नुसार पूर्णा शहरातील व्यकटी प्लांट येथील एक चाळीस वर्षीय शिक्षिका नेहमी प्रमाणे शनिवार, दि.०४ डिसेंबर रोजी धनगर टाकळी येथील जि.प. शाळेत गेल्या होत्या. परंतू शनिवार असल्याने शाळा १ वाजता सुटल्याने ४थीच्या वर्गात एकटी पाहून मुख्याध्यापक कोमटवार यांनी सदर शिक्षिकेस वाईट हेतूने छेडछाड करण्यास सुरवात केली. त्या वर्गातून बाहेर निघत असताना केस धरून खाली पाडले व जातीवाचक शिवीगाळ केली. यानंतर पीडित महिला घरी आली. त्यानंतर शिक्षिकेचा पती बाहेर गावाहुन परत आल्यानंतर दि.०६ डिसेंबर रोजी सायंकाळी चुडावा पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक कोमटवार यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. या प्रकरणी मुख्याध्यापक कोमटवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या