परभणी : ग्लोबल गुरूकुल इंग्लीश स्कुल जालना येथे दि़१६ जानेवारी रोजी पार पडलेल्या शालेय विभागीयस्तर रोलर स्केटींग स्पर्धेत जिल्हा संघटनेमध्ये खेळाडुंनी उत्कृष्ट कामगिरी करत ११, १४,१७ वर्ष वयोगटात रिंग रेस प्रकारात आर्णव नेहरकर, ओम डहाळै, हाजरा फातेमा, हसिता गिराम, रघविर देशमुख, संस्कार काकडे, श्रावणी मुजमुले, सारा सुलताना, अलिशा भोजानी, अक्षरा मुजमुले यांनी विभागीय प्रथम क्रमांक पटकावला़.
सदारील १० खेळाडूंनी राज्यस्तरीय शालेय रोलर स्केटींग स्पर्धेसाठी निवड झाली आहे़ यांना मुख्य प्रशिक्षक सुर्यकांत डहाळे यांचे मार्गदर्शन लाभले़ या सर्व खेळाडुंचा सत्कार जिल्हा क्रिडाधिकारी नरेंद्र पवार, प्रा़डॉ़माधव शेजूळ, निलिमा देशमुख, तरन्नुम सुलताना, शिवराज सोनटक्के, नवनाथ मुजमुले, उखळी सरीपंच यांनी विजयी खेळाडुंचे सन्मानचिन्ह व पदक वितरीत करून खेळाडुंचा सत्कार करण्यात आला़