22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeपरभणीराज्य सिनिअर टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धा : पुरुष गटात परभणी विजेता

राज्य सिनिअर टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धा : पुरुष गटात परभणी विजेता

एकमत ऑनलाईन

परभणी/प्रतिनिधी
टेनिसव्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या मान्यतेने आ.मदानभाऊ येरावार यांच्या सहकार्याने व टेनिसव्हॉलीबॉल असोसिएशन यवतमाळ यांच्या वतीने दि.२६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान राज्य सिनिअर टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाली. राज्य सिनियर पुरुष गटात परभणी तर महिला गटात बीड जिल्हा तर मिश्र दुहेरी गटात सोलापूर अजिंक्य ठरला. पुरुष गटात उपांत्य फेरीत परभणी संघाने लातूर संघाचा २-१ सेट मध्ये कडवी झुंज देऊन अंतिम फेरी गाठली. तर दुस-या उपांत्य फेरीत सोलापूर संघाने नवि मुंबईचा २-१ पराभव करत अंतिम फेरी गाठली.

अंतिम सामन्यात परभणी वि. सोलापूर संघात अतितटीची लढत होऊन २-१ सेटमध्ये परभणी- प्रथम, सोलापूर- व्दितीय तर लातूर -तृतीय ठरला. महिला गटात बीड – प्रथम, चंद्रपूर- व्दितीय तर यवतमाळ तृतीय ठरला. मिश्र दुहेरीत सोलापूर- प्रथम, परभणी- व्दितीय, बीड – तृतीय विजेता ठरला.वयस्कर गटात : एकेरीमध्ये साहेबराव राठोड- प्रथम (यवतमाळ ), जयकुमार सोनखासकर – व्दितीय (अकोला), किरण घोलप (नाशिक), दुहेरी गटात- हिंगोली, यवतमाळ, परभणी अनुक्रमे विजयी ठरले.

बक्षिस वितरण सोहळा टेनिसव्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड यांच्या हस्ते संपन्न झाला. राज्य संघटनेचे अध्यक्ष सुरेश रेड्डी क्यातमवार, राज्य सचिव गणेश माळवे, डॉ. रामपूरकर, संजय कोल्हे, डॉ. विकास टोणे, विभागीय सचिव जयकुमार सोनखासकर, रामेश्वर कोरडे, राज्य सहसचिव किशोर चौधरी, संजय सातारकर, जिल्हा सचिव अभय धोबे, उपाध्यक्ष प्रकाश उदासी, प्रा.निलेश भगत, सहसचिव शाहीद सय्यद, रवींद्र पाळेकर, विकास शेळके, मीर, गिरीराज गुप्ता आदी उपस्थित होते.

स्पर्धेत पंच मंडळ अध्यक्ष प्रफुल्ल कुमार, सतिश नावाडे, प्रमोद महाजन, गजानन शिंदे, गणेश पाटील, अक्षय गामणे, विवेक मल्लिक यांनी काम पाहिले.सूत्रसंचालन डॉ.विकास टोणे यांनी केले.परभणीच्या संघाने यवमतमाळच्या टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरूष गटात प्रथम तर मिश्र दुहेरीत द्वितीय पुरस्कार पटकावल्याबद्दल क्रिडा प्रेमीतून खेळाडूंचे कौतूके होत आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या