22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeपरभणीराष्ट्रीय छात्र सेनेमुळे देशसेवेची भावना निर्माण होते : अविनाशकुमार

राष्ट्रीय छात्र सेनेमुळे देशसेवेची भावना निर्माण होते : अविनाशकुमार

एकमत ऑनलाईन

परभणी: महाविद्यालयीन जीवनामध्ये राष्ट्रीय छात्र सेना देशसेवेची प्रगाढ भावना निर्माण करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावत आहे. सैनिकाची वर्दी ही फक्त वर्दी नसून त्यांच्या शरीराचा एक भाग असतो. देशाभिमान आणि राष्ट्रसेवेचे वृत्त घेतलेले एनसीसीचे विद्यार्थी आपल्या आयुष्यात नेहमीच यशस्वी होताना दिसतात हे मला गर्वाने सांगावेसे वाटते असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाशकुमार यांनी केले.

येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने शनिवार, दि.२७ रोजी राष्ट्रीय छात्र सेना दिवस आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाशकुमार उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख लेफ्टनंट डॉ. प्रशांत सराफ उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय छात्र सेनेचे सैन्यात भरती झालेल्या मुकेश राऊत, अमोल सुक्रे, गणेश पुरी, विजय राठोड, ज्ञानेश्वर भोसले, रणजित कोकरे आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.जाधव म्हणाले, मागील अनेक वषार्पासून महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या वतीने देशसेवेसाठी सैनिक आणि पोलीस समर्पितपणे निर्माण करण्याचे काम सातत्याने होत आहे. याचा महाविद्यालयाचा प्रशासक या नात्याने मला अभिमान आहे. कार्यक्रमाची सांगता एनसीसीच्या गीताने झाली. प्रास्ताविक लेफ्टनंट डॉ.प्रशांत सराफ, सूत्रसंचलन चंद्रकांत सातपुते तर आभार प्रदर्शन रितेश बाबर यांनी मानले. यशस्वीतेसाठी सुरेश पेदापल्ली, साहेब येलेवाड, इजराईल पठाण, पंढरी पडोळे, विठ्ठल लबडे आदींनी परिश्रम घेतले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या