सेलू/प्रतिनिधी
पाथरी तालुक्यातील लाडनांद्रा या गावात ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थानची यात्रा होती. यात्रेत पोलिस व जुगार घेणारे यांच्यात रविवार, दि.०३ रात्री वादविवाद झाला. त्यानंत यात्रेत गोंधळ उडाला व जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना घडली. या घटने एका पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस जखमी झाले आहेत. सध्या लाड नांद्रा गावात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावपूर्ण शांतता आहे.
पाथरी तालुक्यातील लाडनांद्रा या गावचे ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थानचि याञा दि.०३ एप्रिल रोजी भरण्यात आली होती. या यात्रेत जुगार चालू असल्याची माहिती पाथरी पोलिसांना कळताच पोलीस पथकाने रात्री १०.३० वाजता तिथे दाखल झाले. यावेळी जूगार घेणारे व पोलीस यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांनी जुगार बंद करण्याचे तसेच सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन केले. परंतू पोलिस व जुगा-यात अचानक झालेल्या वादामुळे यात्रेत मोठा गोंधळ उडाला. यात्रेतील अवैध व्यवसाय विरोधात पोलिसांनी कारवाईचे हत्यार उपसले तेंव्हा पोलिस आणि अवैध धंदे करणा-यात वादविवाद झाला. यावेळी काहींनी पोलिसांवर तूफान दगडफेक सुरु केली.
या दगडफेकीत पाथरीचे पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सय्यद जाफर, पोलिस नाईक सुरेश कदम, सुरेश वाघ, मूजमूले तसेच अन्य कर्मचारी जखमी झाले. या प्रकारानंतर वरीष्ठ पोलिसांनी तात्काळ गावी धाव घेतली व रात्रभर दगडफेक करणा-या संशयितांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. अचानक घडलेल्या घटनेमुळे गावातील यात्रेत गोंधळाचे वातावरण उडाले होते. परंतू पोलिसांनी सर्वत्र शांतता रहावी यासाठी सेलु, पाथरी, परभणी येथुन मोठा पोलीस बंदोबस्त मागवन गावात तैनात केला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान या घटनेतील काही पोलीस कर्मचा-यांवर परभणी येथे उपचार करण्यात येत असल्याचे समजते.