माहूर : तालुक्यातील वाई बाजार ग्राम पंचायत प्रशासनाने व पदाधिर्कायाने दि.२७ नोव्हे रोजी केलेल्या अवैध वृक्ष तोड प्रकरणी पंचनामा होवून देखील अद्याप माहूर वन विभागाकडून संबंधीतावर कारवाई करण्यात आली नसल्याने वन विभागातील अधिर्कायाच्या कार्यप्रणालीवर संशय घेतला जात आहे.
बहू चर्चीत असलेल्या वाई बाजार ग्राम पंचायतने रस्त्यात अडसरठरू पाहणारे व नागरिकांच्या जीवास धोका असल्याचे भासवून विकास कामाच्या नावाखाली गावात येर्णाया प्रमुख मार्गाच्या कडेला असलेल्या ५० वर्षांपूर्वीच्या सुस्थितीत लिंबांच्या झाडाची कत्तल केली आहे.
या प्रकरणी वन क्षेत्र अधिकारी यांच्या सुचनेवरुण वनरक्षक यू,जी सोनटक्के यांनी दि.२७ नोव्हे रोजी जायमोक्यावर जावून अवैध वृक्ष तोड थांबवून दोन कटाई मशीन ताब्यात घेवून पंचानामा केला परंतु या प्रकरणी अद्याप कारवाई केली नसल्याने वन विभागाच्या कार्यप्रणालीवर संशय घेतला जात आहे.
एकीकडे महाराष्ट्र शासन वृक्ष लागवडीसाठी लाखो रुपये खर्च करत आहेत.तर दुसरीकडे माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी बिनधास्तपणे दिवसा ढवळ्या वृक्ष तोड करत असल्याने शासनाच्या उद्देशाला केराची टोपली दाखवली जात असल्याने या प्रकरणातील वृक्षतोड करणा-यांंविरोधात वन विभागाने कारवाई करून परीसरातील नागरिकांना आपली कर्तव्यदक्षता दाखवण्याची वेळ आत्ता संबंधित विभागांवर आली आहे.