24.7 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeपरभणीवालूरची हेलिकल स्टेपवेल दीपोत्सवाने उजळली

वालूरची हेलिकल स्टेपवेल दीपोत्सवाने उजळली

एकमत ऑनलाईन

परभणी : वालुरच्या ग्रामस्थांनी सामूहिक श्रमदानाद्वारे येथील पुरातन बारवेचे पुनरूज्जीवन केले आहे. वालूर येथील या बारवेने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष वेधून घेतले आहे.

सेलू तालुक्यातील वालूर येथील या हेलिकल स्टेपवेलची (बारव) सोमवारी सायंकाळी गावक-यांनी महाआरती केली. तसेच या बारवेत दीपोत्सव करून गांवकरी मंडळींनी तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी संपूर्ण गावाने आनंदोत्सव साजरा केला. दिव्यांच्या रोषणाईने संपूर्ण बारवेचे सौंदर्य उजळून निघाले होते. यावेळी उमेश राजवाडकर, जोशी बुवा, पाठक मामा यांनी बारवेची विधीवत पूजा केली.

सेलूचे तहसीलदार दिनेश झांपले, मंडळ अधिकारी माने, तलाठी नीलेश पराचे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. सरपंच संजय साडेगांवकर, शैलेश तोष्णीवाल, राजेश साडेगावकर, रामराव बोडखे, गोविंद सोनी, योगेश मुंढे, गणेश खर्डे, दत्ता राख, दराडे यांच्यासह संपूर्ण गाव बारवेनजिक उपस्थित होता.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या