19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeपरभणीविजय मोरे यांना उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार प्रदान

विजय मोरे यांना उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार प्रदान

एकमत ऑनलाईन

परभणी : येथील श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्रबंधक विजय मोरे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी दिला जाणारा उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी पुरस्कार ०१ डिसेंबर (बुधवार) रोजी विद्यापीठाच्या सभागृहात पदमश्री डॉ.तात्याराव लहाने यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो.डॉ.उद्धवराव भोसले, प्रकुलगुरु प्रो.डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ.सर्जेराव शिंदे यांची उपस्थिती होती. विद्यापीठ स्तरावरून यावर्षी पासून हा पुरस्कार सुरू केला आहे. हा सन्मान प्राप्त करण्याचा पहिला बहुमान श्री. विजय मोरे यांना प्राप्त झाला आहे. शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि पाच हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

श्री.मोरे मागील १५ वर्षांपासून प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. एनपीटीई एल आणि स्वयम सारख्या ऑनलाईन शिक्षण प्रणालीवर पूर्ण केलेले अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचे कार्य केले. याची दखल चेन्नई आयआयटीने त्यांना अंबेसेडर म्हणून प्रशस्ती दिली आहे. या सर्व कार्याची दखल घेत विद्यापीठाने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ.प्रकाशदादा सोळंके, सरचिटणीस आ.सतिशभाऊ चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख सदस्य हेमंतराव जामकर, प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापूरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचा-यांनी अभिनंदन केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या