27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeपरभणीविजेच्या तारांमुळे साडेतीनएकर ऊस जळून खाक

विजेच्या तारांमुळे साडेतीनएकर ऊस जळून खाक

एकमत ऑनलाईन

परभणी : तालुक्यातील साटला या गावात आज सकाळी उभ्या असलेल्या उसाला वीजेचा लोम्बकळणा-या तारेचा धक्का लागल्याने आग लागली़ यामध्ये साडेतीन एकर मधील ऊस जळून खाक झाला आहे़ या घटनेत शेतात असलेल्या कुत्र्याला आपला जीव गमवावा लागला आहे़
साटला गावातील शेती सर्व्हे गट क्रमांक ८३ व ८४ मधील शेतकरी असलेले व्यंकटराव मुंजाजी शिंदे व संजय व्यंकटराव शिंदे यांची शेत जमीन आहे़ या पैकी साडेतीन एकरमध्ये ऊस लावला होता़ विजेच्या धक्क्याने हा ऊस भस्मसात झाला आहे़

महावितरणकडे वारंवार विनंती अर्ज, निवेदने करूनही त्यांनी ही विजेची तार व्यवस्थित केली नाही़ त्यांच्या उदासीन भूमिकेमुळे आज शेतक-यांवर ही वेळ आली आह़ सावकाराकडून कर्ज घेऊन हा ऊस जोपासला होता़ सावकाराचे जवळपास दीड लाख रुपये कर्ज घेऊन खतपाणी केले होते़ आता ऊस जळून खाक झाल्याने कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे़ कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न निर्माण झाला असून अगोदरच शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत असताना ही घटना गंभीर आहे़ शासनाने आता तरी लक्ष घालून या शेतक-याला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी होत आहे़ बळीराजा साखर करखान्याकडे सातत्याने विनंती करूनही ऊस घेऊन जाण्यास दिरंगाई करण्यात आली़ वेळीच हा ऊस करखान्याने नेला असता तर या शेतक-यावर आज ही वेळ आलीच नसते़ गावचे सरपंच यांनी सुद्धा प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेऊन ऊस वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही़ या शेतक-यास तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे़

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या