26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeपरभणीविद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिवस विना गणवेश साजरा करावा लागणार

विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिवस विना गणवेश साजरा करावा लागणार

एकमत ऑनलाईन

पूर्णा : शिक्षण विभागाच्या हलगर्जीपणामुळे गणवेशाचा निधी रखडल्याने तालुक्यातील जिल्हा परीषद शाळेच्या विद्यार्थ्यांना अद्याप पर्यत गणवेश न मिळाल्याने यंदा स्वातंत्र्य दिवस विद्यार्थ्यांना विना गणवेश साजरा करावा लागणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे़ याकडे शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत नागरीकातून व्यक्त होत आहे़.

पूर्णा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ११ शाळा आहेत़ या शाळांमध्ये या वर्षी मुली ६७२८, अनसुचित जाती १२२९, अनुसूचित जमाती ७७, दारिद्रय रेषेखालील ८८० असे एकूण ८९१४ पात्र विद्यार्थ्यांचा ५३४८४०० रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना संकटात सर्व शाळा बंद होत्या.

परंतू आता कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाने सर्व निर्बंध उठवून १५जून पासून शैक्षणिक वर्ग सुरू केल्याने सर्व शाळा पूर्व पदांवर सुरू झाल्या आहेत. शाळेच्या पहिल्या दिवशी इयत्ता ०१ली ते ०८वीच्या विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके व गणवेश देण्यात येतो.

पुर्वी गणवेशाचा निधी समग्र योजनांतर्गत शाळेच्या शालेय व्यवस्थापण समितीच्या खात्यात जमा करण्यात येत होता़ परंतू या वर्षी पीएफएमएस प्रणालीद्वारे शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यात गणवेशाचा निधी जमा करण्यात येणार होता. परंतू शाळा सुरू होऊन दीड महिना झाला असून या निधीचा अद्याप ठावठिकाणा नाही.

या आधी जिल्हा शिक्षण विभागाने २६ जानेवारीलाही विद्यार्थ्यांना गणवेश देण्याची घोषणा करून जाचक अटी नियम घातल्याने २६ जानेवारीला विद्यार्थ्यांना गणवेश देण्याच्या घोषणा हवेत राहिल्या होत्या. आता या वर्षीही जिल्हा शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठय पुस्तके आणि शालेय गणवेश देण्यात यईल अशी घोषणा करूनही १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस काही दिवसांवर असताना पात्र शालेय विद्यार्थ्यांना गणवेश निधी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा न झाल्याने विद्यार्थ्यांना गणवेश वाटप झाला नाही़.

त्यामुळे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस विद्यार्थ्यांना गणेवश विना साजरा करावा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे़ शिक्षण विभागाने याकडे जातीने लक्ष घालून त्वरित गणवेशाचा निधी व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा करण्याची मागणी पुढे येत आहे़

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या