29.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeपरभणीविद्युत तारांच्या घर्षनाने दोन एकर ऊस जळून खाक

विद्युत तारांच्या घर्षनाने दोन एकर ऊस जळून खाक

एकमत ऑनलाईन

परभणी : तालुक्यातील बाभळी येथील शेतकरी शिवाजी रामराव आनेराव यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत तारांचे घर्षन होवून स्पार्कींग झाल्याने गट क्र.७० मधील २ एकर ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये जवळपास २ ते २.५ लाख रूपयांचे नुकसान झाले. ही घटना बुधवार, दि.०८ रोजी दुपारी ३.३० वाजता घडली.

या संदर्भात महावितरणच्या कर्मचा-यांना वारंवार सुचना करूनही लोंबत असलेल्या तारा दुरूस्त केल्या नाहीत. परीसरात जवळपास ७ ते ८ शेतक-यांचा ५० ते ६० एकर ऊसाचे क्षेत्र होते. परंतू गावक-यांनी लागलेली आग तात्काळ अटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी परभणी येथील अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आल्यानंतर पुढील अनर्थ टळला. महावितरणच्या गलथान कारभारामुळे शेतक-यांना फायदा कमी अन नुकसान जास्त असा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात दिलेल्या निवेदनावर संदीप शिवाजीराव आनेराव यांचे नाव आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या