22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeपरभणीवीज कनेक्शन कट करणे म्हणजे महावितरणची निजामशाही

वीज कनेक्शन कट करणे म्हणजे महावितरणची निजामशाही

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने अडचणीत आणि संकटात सापडलेल्या शेतक-यांना मदत करण्याऐवजी वीज बिल वसुलीच्या नावाखाली वीज पुरवठा तोडून अन्याय करणा-या महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात शुक्रवार, दि.२६ रोजी भारतीय जनता पक्षाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी ठाण मांडून जोरदार निदर्शने केली. यावेळी आ.बोर्डीकर यांनी वीज कनेक्शन कट करणे म्हणजे निजामशाही असल्याचे सांगत आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका यांनी घेतली. त्यानंतर मुख्य अभियंता अन्नछत्रे यांनी लेखी पत्र अ.बोर्डीकर यांना देवून यापुढे वीज कनेक्शन कट करणार नाहीत तसेच ज्यांचे कनेक्शन कट केले आहेत त्यांचे दोन बिला पैकी एकच बिल शेतक-यांनी आता भरावे, असे वीज वितरण कंपनीकडून लेखी स्वरूपात देण्यात आले.

वीज वितरण कंपनी व सरकार कृषीपंपाचे ७६ हजार कोटी थकबाकी असल्याचे खोटे सांगत आहे. वीज कंपनी परिपत्रक क्रमांक ६५ नुसार तीन महिन्यापेक्षा जास्त सरासरी बिल दिले तर नंतर सर्व सरासरी बिले रद्द करावी अशा स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयाच्या असताना आपण कृषिपंपाची बिले कशाच्या आधारे देत आहोत? असा सवाल यावेळी करण्यात आला. औरंगाबाद खंडपीठाने नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालानुसार ५० लाख रुपये ग्राहकांना अंदाजे सरासरी बिल दिल्याचे मान्य केले आहे. पाच वर्षात कृषी पंप ग्राहकांनी २२ हजार कोटी ज्यादा बिले भरली आहेत. त्याचा परतावा आपण शेतक-यांना तातडीने द्यावा महाराष्ट्रातील शेतकरी आधिच फसव्या कर्जमाफीने, अतिवृष्टीने प्रचंड अडचणीत असताना महावितरण त्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असल्याचे आ.बोर्डीकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शेतकरी संकटात असताना परभणीच्या पालकमंत्र्यांना शेतक-यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ नाही. मात्र शाहरुख खानच्या पोराची आणि स्वत:च्या जावयाची वकिली करायला वेळ आहे.

पालकमंत्री जर परभणीला आले तर त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिला. यावेळी आ.मेघना बोर्डीकर, माजी आ.मोहन फड, ज्येष्ठ नेते विजयराव वरपुडकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष शिवराज नाईक, खंडेराव आघाव, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा डॉ. विद्या चौधरी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, खंडेराव आघाव, रंगनाथ सोळंके, बळीरामजी कदम, डॉ.उमेश देशमुख, आनंदराव बनसोडे, भुजंगराव काळे, भागवतराव जोगदंड, आनंदराव पालवे, शिवाजीराव कवाळे, सुशील रेवडकर, शिवाजी भोसले, विजय कराड, नवनाथ वाघ, अरुण गवळी, बिराजदार माधवराव चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यांच्यासह जिल्ह्यातील भाजपा पदाधिका-यांसह शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या