22.1 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeपरभणीशासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तरुणांनी पुढे यावे

शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तरुणांनी पुढे यावे

एकमत ऑनलाईन

परभणी : स्वातंत्र्योत्तर भारतात शासकीय योजनांची माहिती तळागाळा पर्यंत पोहचून त्याचा वंचीत घटकांना लाभ मिळवून देण्यासाठी सुशिक्षित तरुणांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. भारत छोडो आंदोलनात जसे सर्व एकसंघ झाले होते. त्याप्रमाणे वंचीत घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सामुहिक चळवळीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सहाय्यक आयुक्त गिता गुठ्ठे यांनी केले.

आझादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत सहाय्यक आयुक्त समाजकल्याण परभणी व जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री शिवाजी महाविद्यालयात शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करतांना गुठ्ठे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.बि.यु.जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक चंद्रकांत साठे, ओबीसी महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस.एन.झुंजारे, वसंतराव नाईक विजाभज महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.जी.गवल, दिव्यांग आणि महात्माफुले महामंडळचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र डोखे, चर्मोद्योग महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक पराते, नोडल ऑफीसर तथा सहाय्यक लेखाधिकारी गणेश पुजारी, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक एल.एस. गायके, टि.बी.दवणे यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलतांना गुठ्ठे म्हणाल्या की, समाजामध्ये आजही दिव्यांग, तृतीयपंथी हा घटक विकास योजनेपासून दुर आहे. यासाठी सामुहिक सकारात्मक प्रयत्नाची गरज आहे. तसेच शासकीय वसतीगृह, बार्टी संस्थेअंतर्गत महाज्योती, दलीत वस्ती विकास, दादासाहेब सबळीकरण योजना, मिनी ट्रॅक्टर अशा विविध योजनांची सविस्तर माहिती त्यांनी विषद केली. ही माहिती वंचीत घटकापर्यंत पोहचविण्याचे अवाहन युवकांना त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमस्थळी समाजकल्याण व विविध महामंडळाच्या वित्तीय योजना व माहितीसाठी स्टॉल लावण्यात आले होते. सुत्रसंचालन रेवणअप्पा साळेगांवकर यांनी केले. यशस्वीतेसाठी नोडल ऑफीसर गणेश पुजारी, अधिक्षक एन.ए.खंडारे, समाजकल्याण निरीक्षक तुकाराम भराड, कर्मचारी एम.एम.सोगे, महेश घुगे, खोसे यांनी परिश्रम घेतले. यावेळी नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या