परभणी : शहराला धूळ मुक्त करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार, दि.१६ फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेवर जोरदार ठिय्या आंदोलन करण्यात आले. आक्रमक झालेल्या आंदोलकांची धास्ती घेवून मनपा आयुक्तांनी प्रचंड पोलीस बंदोबस्त मागवला होता. यावेळी आंदोलकांनी आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडला होता.
परभणी शहरांमध्ये सर्वच रस्ते खड्डेमय झाले असून धुळीच्या साम्राज्यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शहरातील रस्ते तात्काळ दुरुस्त करण्यात यावेत. अनुसया टॉकीज समोरील अनाधिकृत घनकचरा संकलन केंद्र तात्काळ बंद करावे. रमाई घरकुल योजनेप्रमाणे प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये मालमत्ता कर व नमुना आठ ग्रा धरून घरकुल मंजूर करावे. महानगरपालिकेने शहरातील व्यापा-यांना व्यवसाय परवानाकाढण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. यामुळे व्यापारी वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापा-यांना दिलेल्या नोटीस तात्काळ परत घेण्यात याव्यात.
महानगरपालिकेने मालमत्ता करावर शास्ती आकारणी केली आहे. ही शास्ती ३१ मार्च पर्यंत माफ करण्यात यावीÞ शहरातील नागरीकांना मुलभूत नागरी सुविधा तात्काळ द्याव्यात आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलेÞ यावेळी आयुक्त सांडभोर यांनी आंदोलकांचे निवेदन घेण्यास वेळ न दिल्याने संतप्त झालेल्या आक्रमक शिवसैनिकांनी मनपा समोरच ठिय्या देत आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडला होता. आंदोलकांच्या आक्रमक पवित्रा पाहून आयुक्तांनी मोठा पोलीस बंदोबस्त मागवून घेतला. त्यामुळे मनपा परीसरात तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व युवासेना, महिला आघाडी, दलित आघाडी यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी पोलीस उपाधीक्षकांसह मोठा पोलीस बंदोबस्त मागवून घेतल्यामुळे संपूर्ण महापालिका परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. जोपर्यंत मनपा आयुक्त स्वत: निवेदन स्वीकारत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतली होती .
अखेर आमदार डॉ.राहुल पाटील यांनी मध्यस्थी करत मनपा आयुक्तांना निवेदन दिले. येत्या आठ दिवसात मनपाचा कारभार न सुधारल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र स्वरूपातील आंदोलन केले जाईल असा खणखणीत इशारा आमदार डॉ. पाटील यांनी यावेळी दिला.
या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, महिला विधानसभा संघटक अंबिका डहाळे, अतुल सरोदे, युवासेना जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले, अनिल डहाळे, अरंिवद देशमुख, ज्ञानेश्वर पवार, सुभाष जोंधळे, प्रशास ठाकूर, सुशील कांबळे, नवनीत पाचपोर, युवासेना शहर प्रमुख विशु डहाळे, बाळराजे तळेकर, अमोल गायकवाड, करामत खान, राहुल खटींग, मारूती तिथे, दिलीप गिराम, गणेश मुळे, शुभम हाके, मकरंद
कुलकर्णी, बबलू घागरमाळे, सचिन गारुडी, गोपाळ कदम, कैलास पवार, अब्दुल्ला राज, संदिप चौधरी, अजय चव्हाण, कपिल मकरंद, शेख अस्लम, सतीश शिर्के, नरेश देशमुख, सोनू अग्रवाल, शिवा चव्हाण, वंदना कदम, नंदीनी पानपट्टे, कविता नांदुरे, बाळासाहेब राखे, रोहन कांबळे, रमेश शिर्के, ज्ञानेश्वर गिरी, राजू कदम, गोंिवद इक्कर, कैलास पतंगे, नागू देशमुख, सौŸकासले आदीसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, दलित आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते.