27.9 C
Latur
Friday, January 21, 2022
Homeपरभणीशैलेश कुलकर्णींच्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

शैलेश कुलकर्णींच्या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

एकमत ऑनलाईन

परभणी : येथील शैलेश कुलकर्णी या युवकाने वेगवेगळ्या जनजागृतीसाठी बुलेट मोटारसायकलद्वारे आजपर्यंत ६ वेळा संपूर्ण देश पादाक्रांत केला असून या मोहिमांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली आहे. परभणीच्या या तरुणाच्या विक्रमाची इंडिया बुकमध्ये नोंद झाल्याबद्दल कुटूंबियांसह नातेवाईक, मित्र परिवार व परभणीकरांद्वारे शैलेशवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

येथील वसमत रस्त्यावरील येलदरकर कॉलनीतील रहिवाशी शैलेश कुलकर्णी या ध्येयवेड्या तरुणाने स्वत:चा व्यवसाय सांभाळत सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून वेगवेगळ्या जनजागृतीसाठी मोठ्या प्रमाणावर भ्रमंतीच्या मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नुकतीच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण अभियानाच्या जनजागृतीसाठी त्याने चारधाम व आद्य शंकराचार्यांनी स्थापित केलेल्या चार सिध्दपीठांची निवड केली अन ९ ते १६ ऑक्टोंबर दरम्यान शैलेश कुलकर्णी याने स्वत:च्या बुलेट गाडीवर ही मोहिम पूर्ण केली. या प्रवासामध्ये त्याने दररोज ६०० ते ७०० किलोमीटर प्रवासात गायत्री पीठ (द्वारका), ज्योती मठ (बद्रीनाथ), गोवर्धन पीठ (जगन्नाथ पुरी), श्रृंगेरी पीठ (कर्नाटक) यासह द्वारका, बद्रीनाथ, जगन्नाथपूरी व रामेश्‍वरम या चारधामचा प्रवास पूर्ण केला. त्याच्या या जिद्द, परिश्रम आणि सामाजिक जाणिवेतून केलेल्या मोहिमांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली. मुख्य संपादक बसवरुप रॉय चौधरी यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र, सन्मानपदक शैलेशला बुधवार, दि.०८ प्राप्त झाले.

शैलेश याने आजपर्यंत प्रवासाचे अनेक विक्रम पूर्ण केले आहेत. महाराष्ट्र पोलिस दलातील पोलिस उपअधिक्षक या पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या एस.एम. कुलकर्णी यांचा शैलेश हा लहान मुलगा. बालपणापासूनच वडीलांच्या कठोर शिस्तीत तो वाढला.

रक्तातच शौर्य व पराक्रम असलेल्या कुटूंबात तो मोठा झाला. त्याने प्रत्येकवेळी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आपल्या मोहिमा फत्ते केल्या. त्याच्या या मोहिमेस पत्नी अपर्णा कुलकर्णी, वडील एस.एम. कुलकर्णी, आई रेखा कुलकर्णी, सासरे किशोर जोशी, सासू साधना जोशी यांचे पूर्ण पाठबळ राहीले. त्यामुळेच त्याने भारतीय सेना सन्मान यात्रा (२०१७) ही काश्मीर ते कन्याकुमारी, परभणी – लोंगीवाला- रन ऑफ कच्छ (२०१८), भारत-नेपाळ-भूतान या तीन देशात से नो टू सिंगल युज प्लास्टिक (२०१९), नर्मदा परिक्रमा (फेबु्रवारी २०२०) या परिक्रमेची नोंद ग्रीनीज बुकात झाली. दत्ता परिक्रमा (२०२०). अभियंता असणा-या शैलेश याने या सर्व मोहिमांसाठी लाखो रुपयांचा खर्च सहन केला आहे. भविष्यात योग्य पाठबळ मिळाले तर आणखीन मोठ्या मोहिमा पार पाडण्याचे स्वप्न शैलेश याने व्यक्त केले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या