24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeपरभणीश्रीराम जन्मोत्सवानिमित्त निघाली भव्य शोभायात्रा

श्रीराम जन्मोत्सवानिमित्त निघाली भव्य शोभायात्रा

एकमत ऑनलाईन

परभणी/प्रतिनिधी
श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शहरात रविवार, दि.१० एप्रिल रोजी निघालेल्या भव्या शोभायात्रेने नागरीकांचे लक्ष वेधून घेतले. शहरात ठिकठिकाणी या शोभायात्रेचे पुष्पवृष्टी करीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. शोभायात्रेतील ढोलताशा पथकासह फेटेधारी युवक- युवतींसह भगव्या ध्वजांनी वातावरणात चैतन्य निर्माण केले होते.

परभणी नगरीत मागील ०७ वर्षांपासून प्रभू श्रीराम नवमी निमित्त भव्य ऐतिहासिक शोभायात्रा निघते. या शोभायात्रेत यावर्षी प्रभू श्रीराम यांच्या पालखीसह लहान लहान बालकांची वानरसेना, ढोलताशा व ध्वज पथक, पारंपारीक संस्कृती जपणारे वासुदेव गोंधळी, बालकलाकारांनी मर्दानी खेळाचे देखावे सादर केले. ठिकठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या तसेच भव्य अतिषबाजी करीत शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. ही शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर येथून सायंकाळच्या सुमारास काढण्यात आली. विसावा कॉर्नर, नारायण चाळ, अष्टभुजा देवी मंदिर, गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, नानलपेठ कॉर्नर मार्गे शनिवार बाजार येथे रेणुका माता मंदिर जवळ भव्य महाआरतीने उशीरा रात्री समारोप होणार होता.

या शोभायात्रेत उज्जेन येथील महाकाल मंदिरातील मंजिरा डमरु पथक व केरळ येथील देवा नृत्यम पथक यांच्यासह बच्चेकंपनी वेशभुषा केलेल्या वानरसेनेने उपस्थित नागरीकांचे लक्ष वेधून घेतले होते. नागरीकांनी शोभायात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या