22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeपरभणीसहा़उपप्रादेशिक परीवहन अधिकारी नसल्याने कामे खोळंबली

सहा़उपप्रादेशिक परीवहन अधिकारी नसल्याने कामे खोळंबली

एकमत ऑनलाईन

परभणी : येथील सहायक उपप्रादेशिक परीवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते हे २८ जुलै पासून रजेवर आहेत़ त्यांच्या अनुपस्थितीत कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करण्यास तयार नसल्याने सर्वसामान्य नागरीकांची अनेक कामे खोळंबली आहेत़ याकडे उपप्रादेशिक परीवहन अधिकारी अश्विनी स्वामी या गांभीर्याने पाहत नसल्याने नागरीकांना अडचणींचा सामना करावा लागत असून संपूर्ण जिल्ह्यातून आरटीओ कार्यालयात कामानिमित्त येणा-या नागरीकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे़.

येथील उपप्रादेशिक परीवहन अधिकारी अश्विनी स्वामी या वरीष्ठ अधिकारी असून सुध्दा त्या कोणत्याही फाईलवर सह्या करण्यास तयार नसल्याची चर्चा या ठिकाणी कामासाठी येणा-या नागरीकातून ऐकावयास मिळत आहे़ एखाद्या व्यक्तीने श्रीमती स्वामी यांच्याकडे जावून कामकाजाच्या फाईलवर सही करण्याची विनंती केली असता श्रीमती स्वामी या फाईलवर नकाते यांची स्वाक्षरी घेण्यास सांगून हात झटकून मोकळे होतात.

कार्यालयातील कोणत्याही अधिकारी, कर्मचा-यांवर एखाद्या प्रकरणात कोणती कारवाई झाली अशी विचारणा केली असता तुमचे नेमके दुखणे काय असा उलट सवाल श्रीमती स्वामी करीत असल्याने नागरीकात त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीबद्दल संताप व्यक्त होत आहे़ विशेष म्हणजे श्रीकृष्ण नकाते कामानिमित्त २८ जुलै पासून रजेवर आहेत.

त्यामुळे गाडीवर नावावर करणे, गाडीवर बोजा चढवणे किंवा उतरवणे, नवीन लायसन्ससाठी चाचणी झाल्यानंतर अप्रुव्हल करणे, परमिट असलेली गाडी प्रायव्हेट करणे, मेमो संदर्भातील कागदपत्रांवरील सह्या आदी सर्व कामांच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी नकाते रजेवर असल्याने ही कामे फाईलमध्ये अडकून पडली आहेत़

तसे पाहता नकाते रजेवर असताना या सर्व कागदपत्रांवर श्रीमती अश्विनी स्वामी यांनी स्वाक्षरी करून कामांचा निपटारा होणे आवश्यक आहे परंतू त्या सह्या करण्यास तयार नसल्याने या सर्व कामांसाठी आलेल्या नागरीकांना आरटीओ कार्यालयाचे खेटे मारण्याची वेळ आली आहे़ त्यामुळे आरटीओ कार्यालयातील या सर्व काम करण्याच्या पध्दतीबद्दल नागरीकातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे़

काम करण्याच्या सुचना देणार : कामत
या संदर्भात नांदेड येथील प्रादेशिक परीवहन अधिकारी शैलेश कामत यांच्याशी संपर्क साधून परभणी येथील कार्यालयात २८ जुलै पासून कामे खोळंबली असल्याचे सांगितले असता त्यांनी उप प्रादेशिक परीवहन अधिकारी स्वामी यांनी नागरीकांच्या महत्वपूर्ण कामांच्या फाईलवर सह्या करणे अपेक्षीत असल्याचे सांगितले़ तसेच या संदर्भात आपण त्यांना काम करण्यासंदर्भात सुचना देवूत असेही कामत यांनी सांगितले़ दरम्यान या संदर्भात उपप्रादेशिक परीवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांना माहिती विचारण्यासाठी दूरध्वनी केला असता त्यांनी कॉल न घेतल्याने कोणतीही माहिती मिळू शकली नाही़

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या