22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeपरभणीसाबन व्यवसायाचे आमिष दाखवुन महिलांना गंडविले

साबन व्यवसायाचे आमिष दाखवुन महिलांना गंडविले

एकमत ऑनलाईन

ंिजतूर/प्रतिनिधी
ंिजतूर शहर आणि तालुक्यातील महिलांना घर बसल्या साबन व्यवसाय करण्याचे अमिष दाखवून फसवणुक करणा-या ठाणे येथील आरोपी विरोधात ंिजतूर पोलिस ठाण्यात फसवणुकीच गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणी कविता संजय सुर्यवंशी यांनी तक्रार दिली असून आहेÞ फिर्यादी ह्या अंगणवाडी सेविका असून ंिजतूर तालुक्यातील पांढरगळा येथील रहिवाशी आहेत. दि.२४ सप्टेंबर २०२१ रोजी फिर्यादीच्या मैत्रिणीने त्यांना फोन करून एका साबुन बनविणा-या कंपनी विषयी माहिती दिली. सदर कंपनीकडून घर बसल्या साहित्य येणार असून साबुन बनवुन दिल्यावर त्याचा मोबदला मिळणार असल्याचे सांगितले. या विषयी माहितीसाठी शंकर कारभारी जाधव (रा. ठाणे) यांची ओळख करुन दिली.

संबधीत इसमाने फिर्यादीला फोन करुन माहिती सांगुन आयडी बनविण्यास कळविले. त्यानुसार महिलेने स्वत:चा आयडी बनविला. सुरुवातीचे काही दिवस सर्व व्यवस्थीत चालले. त्यानंतर शंकर जाधव याने वेळेवर कामाचे पैसे दिले नाही. तसेच फिर्यादीने कंपनीशी जोडलेल्या इतर महिलांनाही काम दिले नाही. कंपनीकडे भरलेले पैसे परत मागितल्याने शंकर जाधव याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर संबधीत आरोपी विरोधात ंिजतूर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने ंिजतूर शहर आणि परिसरातील महिलांची ५६ हजार रुपयांची फसवणुक केली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या