36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeपरभणीस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भगवा फडकणारच

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भगवा फडकणारच

एकमत ऑनलाईन

परभणी/प्रतिनिधी
परभणी जिल्हा गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असून सुरूवातीपासून येथील जनतेने शिवसेनेचे आमदार आणि खासदार निवडून दिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भगवा फडकणारच असून शिवसेना, युवासेना कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन युवासेना कार्यकारिणी सदस्य सिध्देश रामदास कदम यांनी केले.

परभणी येथील बी.रघुनाथ सभागृहात बुधवार, दि.०१ डिसेंबर रोजी परभणी विधानसभा मतदार संघातील युवासेना कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमात युवासेना नेते कदम बोलत होते. यावेळी खा.संजय जाधव, युवासेना विस्तारक राहूल लोंढे, अभिषेक शिर्के, युवासेना परभणी संपर्क प्रमुख प्रदिप खेडेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम, उपजिल्हा प्रमुख सदाशिव देशमुख, तालुका प्रमुख नंदकुमार आवचार, महिला संघटक अंबिका डहाळे, जि.प.सदस्य प्रतिनिधी गंगाप्रसाद आनेराव, गजानन देशमुख, रविंद्र पतंगे, अर्जुन सामाले, संदिप झाडे, ज्ञानेश्वर पवार, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, बाळराजे तळेकर, विशू डहाळे, संजय सारणीकर आदि उपस्थित होते.

यावेळी खा.संजय जाधव म्हणाले की, सोयाबिन, कापूस यांचे उत्पादन येथे मोठ्या प्रमाणात घेतले जात असले तरी कृषीवर आधारीत मोठा उद्योग शासनाच्या वतीने उभारल्यास किमान १० हजार युवकांना रोजगार उपलब्ध होऊ शकेल. यासाठी मुख्यमंत्र्यांनी आमच्या जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रीत करावे असे ते म्हणाले. परभणी विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आ.डॉ.राहूल पाटील यांनी मतदार संघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणल्याने भरीव विकास कामे झाली आहेत. आ.डॉ.पाटील यांच्या पुढाकारातून परभणी येथे खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाचे काम प्रगती पथावर असून येत्या काळात परभणीला दोन वैद्यकीय महाविद्यालय मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक युवासेना परभणी विस्तारक तथा संपर्क प्रमुख प्रदिप खेडेकर यांनी केले. सुत्रसंचालन अभय कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी बाजार समिती सदस्य फैजुल्ला पठाण, राहूल खटींग, दिलीप गिराम, मकरंद कुलकर्णी, केदार दुधारे, स्वप्नील भारती, ऋशिकेश सावंत, अमोल गायकवाड, बाळासाहेब गोडबोले, सुनील पंढरकर, रामा कदम, राहूल गायकवाड, बबलू घागरमाळे, गौतम भराडे, शुभम पाष्टे, प्रदिप भालेराव, विकी पाष्टे, दिग्विजय रणवीर, गोरख तावडे, प्रमोद जोगदंड, प्रताप पवार, विशाल तळेकर, पवन शिंदे, रोहित घनघाव, जईरभई, सादेक खुरेशी, पिंटु पाटमासे, गजानन शिंदे, वंदना कदम, कविता नांदुरे आदिंनी प्रयत्न केले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या