परभणी/प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न होते. त्यांच्या मुळेच धम्माची चळवळ पुढे जात असून देशात प्रत्येकांनी बौद्ध धम्माचे आचरण करणे म्हणजेच भारत बौद्धमय होणे असे होय. बौद्ध धम्म हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने गतिमान होत असून बौद्धमय भारत करण्याची तयारी सुरू झाली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध सिनेअभिनेते गगन मलिक (श्रमन अशोक) यांनी केले.
परभणी प्रसिद्ध सिने अभिनेते गगन मलिक (श्रमन अशोक) व थायलंड देशातील भिक्खू संघ यांच्या भारत भ्रमण धम्मयात्रेचे परभणी शहरात आगमन होताच उपासक वर्ग, महिला मंडळ, युवक वर्गाने उत्सुफर्तपणे पुष्पवृष्टी करून जंगी स्वागत केले. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून भिक्खू संघ उपासक मान्यवर यांच्या उपस्थितीत बी.रघुनाथ सभागृहापर्यंत भव्य धम्मरॅली काढण्यात आली. त्यानंतर स्वागत समारोह धम्मदेशना कार्यक्रम धम्ममय वातावरण मोठ्या थाटामाटात पार पडला. या समारोहाचे आयोजन सिद्धार्थ हत्तीअंबिरे प्रदेशाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग काँग्रेस यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी थायलंड येथील भिक्खू फ्रा कृशीलाखुंसांमातृर्न, फ्रा विनाईसुथीच्युई काम लचान फ्र महाबेंजोंगपोचाई, सिरीचाई यनानवात्तांनो आदी भिक्खू संघ पहिल्यांदाच आगमन झाले होते. अध्यक्षस्थानी डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना सिनेअभिनेते गगन मलिक म्हणाले की, सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यामुळेच मला परभणीत येण्याची संधी मिळाली. मी भिक्खू म्हणून आलो असून धम्म घराघरात पोहचला पाहिजे. थायलंड देशात भारतातून सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा २७ फुटाचा पुतळा नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ.भदंत उपगुप्त महाथेरो धम्मदेशनेत बोलताना म्हणाले की, प्रतिज्ञे सोबत शालेय अभ्यासक्रमात पंचशिलाचा समावेश करण्यात यावा. धम्म प्रचाराचे काम सातत्याने होत आहे असे सांगितले. आ.डॉ.राहुल पाटील यांनी भारत भ्रमण धम्मयात्रा हा परभणीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंद करण्यासारखा आहे असे गौरवोदगार काढले. प्रास्तविकपर बोलताना सिद्धार्थ हत्तीअंबिरे म्हणाले की, परभणी परिसरात पाच एकरच्या जागेवर भव्य बुद्ध विहार निर्माण करणार असून, गगन मलिक यांच्या प्रेरणेने थायलंड येथील, ३५५ बुद्धमूर्ती वितरण सोहळा पार पडला. यापुढे अनेक विहारात हजारो बुद्धमूर्ती देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भिक्खू संघाच्या हस्ते भ.बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बुद्ध वंदना घेण्यात आलीं. भिक्खू संघाचा सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी पुष्प , सन्मान चिन्ह व चीवर दान करून स्वागत केले. यावेळी लोकनेते विजय वाकोडे, ज्येष्ठ नेते बी.एच.सहजराव , प्रकाश कांबळे, गौतम मुंडे, डॉ.बी.टी. धूतमल, डॉ.प्रकाश डाके, भिमराव शिंगाडे, प्रो.डॉ.भिमराव खाडे, भगवान जगताप, यांची उपस्थिती होती. सूत्र संचलन प्रा.सुनिल तुरुक माने, आभार प्रदर्शन प्रो.डॉ.भिमराव खाडे यांनी केले. यशस्वीतेसाठी आयोजक सिद्धार्थ हत्तीअंबिरे, संयोजन समितीचे प्रो.डॉ.संजय जाधव, सुधीर कांबळे, आशिष वाकोडे, चंद्रशेखर साळवे, राजेश रणखांबे, प्रदीप जोंधळे, उत्तम गायकवाड, अमोल धाडवे, मकरंद बाणेगावकर, रमेश सिद्धेवाड, मंचक खंदारे, पंकज खेडकर, अविनाश मालसमिंदर, कपिल बनसोडे, शशीकांत हत्तीअंबिरे, विजय सुतारे, भूषण कसबे आदीने परिश्रम घेतले.