24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeपरभणीलुटमार करणा-या आरोपीस पाच तासांत पकडले

लुटमार करणा-या आरोपीस पाच तासांत पकडले

एकमत ऑनलाईन

सोनपेठ : तालुक्यात करम पाटीजवळ एका कारला अडवून ०४ लाख रूपयांची बॅग पळवल्याची घटना घडली होतीÞ या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे तातडीने फिरवत लुटमार करणा-या दोन आरोपींना अवघ्या पाच तासांत अटक केली आहेÞ त्यांच्या जवळून ०४ लाख रूपये व मोटार सायकल जप्त करण्यात आली आहेÞ सोनपेठ-परळी रोडवर करम पाटीजवळ गंगाखेड ते परळी जाणा-या रोडवर बीड क्रमांक ०३ ग्रामीण दक्षिणेस २५ किलोमीटर अंतरावर विष्णू व्यंकटराव देवसटवार रा.परळी वै.यांच्या मुनीमास अडवून दिÞ२६ जुलै रोजी रात्री ८ वाजता अज्ञात दोन आरोपीतांनी संगनमत करून यातील मुनीमास घेऊन जाणारी कार टाटा टँगो एमएच ४४ झेड ६५४४ चे समोर रोडवर मोटारसायकल आडवी उभी करून फिर्यादीच्या मुनीम व वाचमन यास शिवीगाळ करून थापड बुक्क्यांनी मारहाण केली व त्यांचे जवळील वसुली केलेली अंदाजे चार लाख रुपयाची बॅग रोख रखमेसह बळजबरीने हिसकावून घेऊन पळून गेले होतेÞ

या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध विष्णू व्यंकटराव देवसटवार रा.परळी वै.यांच्या फियार्दीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होताÞ त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बोरकर यांनी तपासाची सूत्रे हलवून यातील आरोपींची ओळख पटवली असता मयूर बाजीराव मोरे रा.मुंगी तालुका परळी वैजनाथ व सचिन सोळंके यास यास चोरीच्या रोख ०४ लाख रुपये व सदरच्या गुन्ह्यातील मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे.आरोपींना तत्काळ अटक करण्यास सोनपेठ पोलिसांनी परिश्रम घेतले आहेत. सदरच्या कारवाईमुळे सोनपेठ पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या