23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeपरभणीविद्यार्थिनींनी स्वत:ची ओळख निर्माण करावी

विद्यार्थिनींनी स्वत:ची ओळख निर्माण करावी

एकमत ऑनलाईन

परभणी/प्रतिनिधी
नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेने कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींना अभ्यासाबरोबरच, प्रमाणपत्र कोर्सेस आणि अभ्यासेतर उपक्रमातून शैक्षणिक सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.उपक्रमशील महाविद्यालय म्हणून सर्वदूर परिचित या महाविद्यालयाने बदलत्या काळाचा वेध घेत विविध विद्याशाखेच्या निमित्ताने संधीची दालने निर्माण केली. इथे शिक्षण घेणा-या विद्याथीर्नींनी आपले कौशल्य विकसित करीत लोकजीवनात आपली स्वत:ची ओळख निर्माण करावी, असे आवाहन नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.किरणराव सुभेदार यांनी केले.

कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन कमलोत्सव समारोप प्रसंगी नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.सुभेदार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले, उपप्राचार्य डॉ.संगीता आवचार, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सुधीर इंगळे, प्रा.पल्लवी कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले यांनी केले तर डॉ.रविंद्र इंगळे यांनी विभागाचा अहवाल वाचन केले. यावेळी विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

विद्यार्थिनींनी कमलोत्सवाच्या निमित्ताने आपल्यातील कलागुणांना वाव देत प्रत्येक स्पर्धेत सहभाग नोंदवत स्नेहसंमेलन यशस्वी केल्याबद्दल कौतुक करित अभ्यासातूनही आपला गुणात्मक दर्जा सिद्ध करावा, असे मत प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पल्लवी कुलकर्णी यांनी केले.आभार ग्रंथपाल संतोष कीर्तनकार यांनी व्यक्त केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या