28.8 C
Latur
Saturday, February 4, 2023
Homeपरभणीशेवडीत मधमाशांचा हल्ल्यात १० शेतकरी गंभीर जखमी

शेवडीत मधमाशांचा हल्ल्यात १० शेतकरी गंभीर जखमी

एकमत ऑनलाईन

जिंतूर : तालुक्यातील शेवडी येथील शेतकरी व मजूर मळणी यंत्रातून सोयाबीन काढत असताना अचानक मधमाशांनी शेतक-यांवर हल्ला चढवल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी घडलीÞ मधमशांच्या हल्ल्यात १० जण गंभीर जखमी झाले आहेतÞ जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिघांची ताब्यातचिंताजनक असल्यामुळे त्यांना परभणी येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक शेतक-यांच्या शेतात मळणी यंत्र नेण्यास अडचणी येत आहेतÞ त्यामुळे शेतक-यांनी खरिपाची पेरणी आटोपून सुरक्षित ठेवलेल्या सोयाबीन काढणीला सुरुवात केली आहेÞ शेवडी येथील शेतात मळणी यंत्रातून सोयाबीन काढत असताना भुसा उडाल्याने बाजूच्या ंिलबाच्या झाडांवर असलेल्या अग्या मोहळाच्या मधमाश्यानी काम करत असलेले शेतकरी, शेतमजूरांच्या शरीरावर हल्ला चढवलाÞ मधमाशांनी अचानक हल्ला चढवून चावा घेण्यास सुरूवात केल्याने शेतक-यांत गोंधळ उडाला होता.

दरम्यान काही मजुरांनी जाळ लावून धुर निर्माण केलाÞ यामुळे मधमाशांनी पळ काढलाÞ. या हल्ल्यात भानुदास सानप वय ५० वर्ष, गणेश मुंडे वय १९ वर्षे, उर्मिला सानप वय ३० वर्षे, बालाजी सानप वय ३० वर्षे, शोभा मुंडे वय ४० वर्ष, पंढरी घुगे वय ४० वर्ष, शंकर खाडे वय १९ वर्षे, रंजना नागरे वय ४० वर्ष, नारायण सानप वय ४३ वर्ष, बाळू घुगे वय २२ वर्ष यांना ग्रामस्थांनी तातडीने खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेÞ यावेळी डॉ.अनिफ खान यांनी सर्व जखमींवर प्राथमिक उपचार केलेÞ मात्र भानुदास सानप, गणेश मुंडे, उर्मिला सानप यांना उलट्या होत असल्याने त्यांना नातेवाईकांनी खाजगी रुग्णालयात हलवले असल्याची माहिती उपस्थित ग्रामस्थांनी दिली आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या