33.3 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home परभणी जिल्हा बँक निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी १०१ अर्ज दाखल

जिल्हा बँक निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी १०१ अर्ज दाखल

एकमत ऑनलाईन

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकरीता सोमवारी दि. 22 रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १०१ अर्ज दाखल झाले. यावेळी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील मातब्बर पुढा-यांसह त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी बँक परिसरात उसळली होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकुण १५४ अर्ज दाखल झाले आहेत.

अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजेश विटेकर, लक्ष्मणराव दुधाटे, रूपाली राजेश पाटील, साहेबराव पाटील गोरेगावकर, राजेश पाटील गोरेगावकर, माजी आ.रामप्रसाद बोर्डीकर, आ.सुरेश वरपूडकर, आ.तानाजी मुटकुळे, माजी खा.शिवाजी माने, गणेशराव रोकडे, अंबादासराव भोसले, चं्रद्रकांत नवघरे, बालासाहेब देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, माजी आ. सुरेश देशमुख, विजयराव जामकर, अंजली रविंद्र देशमुख, प्रेरणा समशेर वरपूडकर, करूणा कुंडगीर, भावना रामप्रसाद कदम, द्वारकाबाई कांबळे, डॉ.सिध्दार्थ भालेराव, अतुल सरोदे, उपमहापौर भगवान वाघमारे, प्रशांत कापसे, स्वराजसिंह परिहार आदिंसह १०१ अर्ज दाखल झाले.

प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व धान्य अधिकोष संस्था मतदारसंघात 14 जागांकरिता 89, कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया संस्था मतदारसंघात १ जागेसाठी ६ अर्ज, इतर शेती संस्था मतदारसंघात १ जागेसाठी 13 अर्ज, महिला राखीव मतदारसंघात २ जागांकरिता 15 अर्ज, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मतदारसंघात १ जागेकरिता १० अर्ज, इतर मागासप्रवर्ग मतदारसंघात १ जागेकरिता ७ अर्ज, विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष प्रवर्ग मतदारसंघात १ जागेसाठी 14 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, उमेदवारी अर्जांची छाणनी प्रक्रिया मंगळवारी (दि.23) सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती श्री.सुरवसे यांनी दिली.

मी पुन्हा येईन…!

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या