27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीसंबोधीच्या सर्वधर्मीय विवाह सोहळ््यात १०५ जोडपी विवाहबद्ध

संबोधीच्या सर्वधर्मीय विवाह सोहळ््यात १०५ जोडपी विवाहबद्ध

एकमत ऑनलाईन

परभणी : संबोधी अकादमी महाराष्ट्र व सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ््यात १०५ जोडपी विवाहबद्ध झाली. अतिशय थाटामाटात व मान्यवरांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला.

प्रमुख अतिथी म्हणून बोलताना खा. फौजिया खान म्हणाल्या, शिक्षण पूर्ण करून नंतर विवाह बंधन स्वीकारावे. संबोधी अकादमीचे कार्य कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महापालिका प्रशासक तथा आयुक्त देविदास पवार, माजी खा. सुरेश जाधव, माजी आ. विजयराव गव्हाणे, माजी आ. मधूसुदन केंद्रे, विजयराव वाकोडे, प्रताप देशमुख, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, बी.एच. सहजराव, सुभाष जावळे, लिंबाजीराव भोसले, हेमा हत्तीअंबिरे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात समाजभूषण भीमराव हत्तीअंबिरे यांनी श्वासात श्वास असेपर्यंत अखंडपणे या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाईल, अशी ग्वाही दिली.
मंगल परिणय विधी पूज्य भंतेजी एस. संघमित्र, पूज्य भंतेजी आनंद, पूज्य भंतेजी भिकूनी बुद्धसेविका यांच्या हस्ते संपन्न झाला. हिंदू पद्धतीने विवाह विधी गुरु करडभाजने यांनी संपन्न केला. सूत्रसंचलन ममता पाटील यांनी तर आभारप्रदर्शन भगवान जगताप यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान जगताप, भीमराव पतंगे, शेषराव जल्हारे, सिद्धार्थ भराडे, बी.आर. आव्हाड, दि.फ. लोंढे, डी.आर. तुपसुंदर, श्रीरंग हत्तीअंबिरे, सचिनराजे हत्तीअंबिरे, दिलीप हत्तीअंबिरे, साईनाथ बोराळकर, डॉ. कैलास फूलउंबकर, नवनाथ पैठणे, माधव मोते, भीमराव धबाले, गंगाधर परसोडे, बाळू कीर्तने,अविनाश मालसमिंदर, नवनाथ जाधव, विजय सुतारे, धनंजय रणवीर, भगवान मानकर, दिलीप पाटील, शशिकांत हत्तीअंबिरे, ज्ञानेश्वर हरकळ, विश्वनाथ डबडे, अक्षय जगताप, एकनाथ खंदारे, मुरलीधर ढेंबरे, एल.आर. कांबळे, गोतम साळवे, भगवान मानकर, रामप्रसाद घुगे, बद्रिनाथ घुले, बालाजी भुसारे, पंकज नरवाडे, अनिरुद्ध धरपडे, राजेश चांदणे, बाबासाहेब भराडे, गोमाजी श्रावणे, संतोष भराडे, संतोष वाघ, सुनिल बोरुंडे आदींनी परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या