23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeपरभणीगोद्री नदीच्या पुराने १२ गावांचा संपर्क तुटला

गोद्री नदीच्या पुराने १२ गावांचा संपर्क तुटला

एकमत ऑनलाईन

चारठाणा : जिंतूर तालुक्यातील चारठाणा व परिसरात गुरुवार दि. ४ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे चारठाणा येथील गोद्री नदीला पूर आला. या पुरामुळे परिसरातील १० ते १२ गावांचा चारठाणा गावाशी संपर्क तुटला होता.

सदर नदीवर कमी उंचीचा पूल असल्याने पावसाळ्यात नेहमीच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. चारठाणा व परीसरात गुरूवारी झालेल्या पावसाने गोद्री नदीला पूर आल्याने ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून मार्ग काढावा लागला. या नदीवरील पुलाची उंची वाढवावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या