31.8 C
Latur
Tuesday, May 11, 2021
Homeपरभणीपरभणीत १२ पाणी व्यवसायांना ठोकले सील

परभणीत १२ पाणी व्यवसायांना ठोकले सील

एकमत ऑनलाईन

परभणी : महापालिकेचे आयुक्त देवीदास पवार यांच्या आदेशानुसार सलग दुसरे दिवशी शहरातील प्रभाग १३ व ८ मधील १२ पाणी प्लांटरवर कारवाई करण्यात आली. शहरातील बेकायदेशीरपणे पाणी व्यवसाय करणा-यांविरूध्द मनपाने कारवाई सुरू केली आहे. काल गुरूवारी १७ पाणी व्यावसायिकांविरूध्द कारवाई करीत प्लांट सील करण्यात आले आहेत. मनपाच्या या कारवाईने बेकायदेशीर पाणी व्यवसाय करणा-यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

परभणी शहरातील बेकायदेशीररीत्या चालविण्यात येणा-या पाणीपुरवठा उद्योगांना आज सलग दुस-या दिवशी देखील सील ठोकण्याची कारवाई महापालिकेच्या अधिका-यांनी केली. काल गुरुवारी १७ उद्योगांना सील ठोकले होते तर आज शुक्रवारी १२ उद्योगांना सील ठोकून त्यांना उद्योगासाठी लागणा-या आवश्यक त्या परवानग्या आणि प्रमाणपत्रे सादर करण्याचे आदेश आयुक्त पवार यांनी दिले आहेत. पाणी शुद्धीकरण केंद्रांकडून कुठल्याही परवानग्या न घेता व शुद्धीकरणाचे प्रमाणपत्र नसताना सर्रास पाण्याच्या जारची विक्री करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने काही दिवसांपूर्वी पाणी व्यवसायिकांना नोटीस देऊन परवाने तसेच केंद्रीय भूजल प्राधिकरणाचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश बजावले होते. मात्र, बहुतांश उद्योजकांनी कुठलीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर काल गुरुवारी महापालिकेच्या अधिका-यांनी परभणी शहरातील 15 पाणी शुद्धीकरण केंद्रांना सील ठोकले.

शहरातील पाणी शुद्धीकरण उद्योगांना प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 9 नोव्हेंबर रोजी महापालिकेच्यावतीने नोटीस बजावण्यात आली होती. ज्यामध्ये या व्यवसायिकांना केंद्रीय भूजल प्राधिकरण आणि अन्न औषधी प्रशासनाचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगण्यात आले होते. या प्राधिकरणाचे प्रमाणपत्र असल्यासच पाणी शुद्धीकरण व्यवसाय सुरू ठेवता येईल असे स्पष्ट निर्देश या नोटीसमध्ये मनपाने बजावले होते. परंतु बहुतांश व्यवसायिकांनी हे प्रमाणपत्र घेतलेच नाही असे या कारवाईतून पुढे आले आहे.

दरम्यान, या कारवाईसाठी आयुक्त देविदास पवार व सहाय्यक आयुक्त संतोष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य स्वच्छता निरिक्षक करण गायकवाड, स्वच्छता निरिक्षक श्रीकांत कुर्‍हा, गंगाधर करे, प्रकाश काकडे, विनायक बनसोडे, जोगेंदर कागडा आदींचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने परभणी शहरातील प्रभाग क्रमांक १२, १६ मधील १५ पाणी शुद्धीकरण उद्योजकांना भेटी देऊन त्यांच्याकडे प्रमाणपत्रांची मागणी केली. परंतु, कुठलेही प्रमाणपत्र या व्यवसायिकांना सादर करता आले नाहीत. त्यामुळे सदर प्रभागातील ज्ञानेश्वर नगर, माऊली नगर, काकडे नगर, परसावत नगर, वर्मानगर आणि साखला प्‍लॉट आदी भागातील या 15 व्यावसायिकांच्या उद्योगांना सील ठोकून कारवाई करण्यात आल्याची माहिती श्रीकांत कु-हा यांनी दिली.

नवीन नळ जोडणीकडे नागरिकांचे दुर्लक्ष
परभणी शहरातील बहुप्रतिक्षित महापालिकेची नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. मात्र प्रत्यक्षात नागरिकांकडून या नवीन नळ योजनेला कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. महापालिकेकडून वारंवार आवाहन करून देखील नागरिक नवीन नळ जोडणी करीत नसल्याने महापालिकेसमोर शहरातील सुमारे 50 हजार मालमत्ताधारकांना नळ जोडणी देण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच शहरात शुद्ध पाण्याच्या नावाखाली पाण्याच्या जार पुरवठा करणा-या व्यावसायिकांचा सुळसुळाट झाला आहे. एकट्या परभणी शहरात शेकडोच्या घरात पाणी शुद्धीकरण उद्योग सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांना नवीन नळ जोडणी घेणे आवश्यक वाटत नाही. त्यामुळे सुमारे २०० कोटी रुपयांची महापालिकेची महत्त्वकांक्षी पाणीपुरवठा योजना दुर्लक्षित झाली आहे. या पार्श्वभूमीवर मनपा जारच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणा-या उद्योगांवर कारवाईचा फास आवळत असल्याचे दिसून येत आहे.

समलिंगी विवाहाबाबत कोर्टाने केंद्राकडून मागितले उत्तर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या