30.6 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home परभणी काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा १३४ पोते तांदूळ जप्त

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा १३४ पोते तांदूळ जप्त

एकमत ऑनलाईन

परभणी : जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथील एका गोदामात काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेला 134 पोते तांदूळ पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने सोमवारी (दि.१) जप्त केला. दरम्यान, जिंतूर पोलिसांनी महसूल विभागास जप्त केलेल्या तांदळाबाबत माहिती दिली असून त्यांच्या अहवालानंतर कारवाई करण्यात येणार आहे.

विशेष पथकाचे फौजदार विश्वास खोले, फौजदार चंद्रकांत पवार यांना जिंतूर तालु्क्यातील भोगावदेवी येथे स्वस्तधान्य दुकानातील धान्याची काळ्या बाजारात विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार श्री.खोले, श्री.पवार यांच्यासह कर्मचारी सुग्रीव केंद्रे, राहूल चिंचाणे, यशवंत वाघमारे, दीपक मुदिराज यांच्यासह जिंतूर पोलिस ठाण्यातील कर्मचारी अनिल हिंगोले, राजेश बाबर पाटील आदींनी मिळालेल्या माहितीच्या आधारावर भोगावदेवी येथील गावाबाहेरील शासकीय स्वस्त धान्य दुकान असलेल्या एका पत्राच्या गोदामात छापा टाकला.

त्यावेळी तेथे 134 पोते तांदूळ आढळून आले. यावेळी तेथे मोहसीन कुरेशी हा आढळून आला. पोत्यांची तपासणी केली असता त्यात तांदूळ असल्याचे निदर्शनास आले. जप्त केलेला हा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशानेच बाळगत असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. त्यास पथकाने ताब्यात घेतले आहे. जिंतूर पोलिस ठाण्यात याबाबत विशेष पथकाने माहिती दिली असून पुढील कारवाई जिंतूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

दरम्यान, भोगाव देवी येथील तो गोडाऊन सील करण्यात आला असून महसूल प्रशासनास तांदळाबाबत माहिती देण्यात आली आहे. महसूल प्रशासनाच्या अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिंतूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी दिली. विशेष पथकाने केलेल्या या कारवाईमुळे धान्याचा काळा बाजार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

हिंदू मुलीशी विवाहासाठी मुस्लिम तरुणाचे धर्मांतर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या