परभणी : परभणी पोलिसांनी परभणी, बीड, नांदेड, पुणे, लातूर व औरंगाबाद या ठिकाणाहून चोरीस गेलेल्या मोटारसायकल प्रकरणातील तिघा चोरट्यांकडून ८ लाख २० हजार रूपयांच्या १४ मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
पोलिस अधीक्षक रागसुधा आर., अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या आदेशान्वये पोनि. वसंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. मारोती चव्हाण, साईनाथ पुयड, व्यंकट कुसमे, पोलीस अंमलदार राहूल परसोडे, सय्यद मोबीन, सातपुते, बालासाहेब तुपसुंदरे, घुगे, सिध्देश्वर चाटे, हरीभाऊ खुपसे, दिलावर पठाण, नामदेव डुबे, राम पौळ, प्रशांत गायकवाड, मधुकर ढवळे, रफीयोद्दीन, निकाळजे, भोरगीर, हुसेन, सायबर विभागाचे बालाजी रेड्डी, राजेश आगाशे, संतोष व्यवहारे, गणेश कौटकर यांना चोरी गेलेल्या मोटारसायकलचा शोध घेण्यासाठी ३ पथक गठीत केले होते.
पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गंगाखेड येथील पठाण आवेज पिता गफार खान (२३), जुनेद खान पिता जरावर खान पठाण(१९) दोघे रा.नेहरू चौक गंगाखेड जि.परभणी, गोविंद उर्फ मकडी पिता दिलीप आंधळे(२६) रा.झोला ता. गंगाखेड यांच्या चोरीच्या मोटारसायकल असून आरोपी धारखेड नदीच्या पुलाजवळ असल्याचे समजले होते.
या आरोपींवर छापा मारून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता गंगाखेड, परळी, पालम, नांदेड व औरंगाबाद येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून ८ लाख २० हजार रूपयांच्या १४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. यातील २ मोटारसायकल भंगामध्ये विक्री करण्यासाठी स्क्रॅप केलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. ही कामगिरी पोलिस अधीक्षक रागसुधा आर., अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरील अधिकारी व पथकाने केली.
——————