27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeपरभणीबस-ऑटोच्या अपघातात १६ प्रवाशी जखमी

बस-ऑटोच्या अपघातात १६ प्रवाशी जखमी

एकमत ऑनलाईन

गंगाखेड : शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील महातपुरी फाट्यावर एसटी आणि अ‍ॅटो रिक्षाच्या भीषण अपघातात जवळपास १६ प्रवासी जखमी झाले आहेत़ अपघातानंतर जवळपास एक तास चाललेल्या मदतीनंतर सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यास प्रशासनासह नागरिकांनी यश आले. जखमींन येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कळमनुरी-लातूर बस क्रमांक एमएच २० बीटी १५२३ चा महातपुरी फाट्यावर सोमवार, दि़१९ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अ‍ॅटोरीक्षासोबत भिषण अपघातात झाला. या अपघातात बसच्या धडकेने अ‍ॅटो पूर्णत: उलटून चेंदामेंदा झाला होता़ या अपघातात एसटी मधील प्रवासी मालन शेख (वय ५५ वर्ष रा.गंगाखेड), लक्ष्मीकांत चिंतामणी सिसोदे (५० रा. इंदेवाडी ता़परभणी), मजीद खान महबूब खान पठाण (४१ रा़दैठणा), सोपान दिगंबर हरगुडे (५८ रा. गंगाखेड), सखाराम बाजीराव जाधव ( ८२ रा.गोंडगाव ता.गंगाखेड), मारुती काळबांडे (४० रा़बोरी ता. हिंगोली), नागेश गंगाधर दोडे (२९ रा़सांगवी जि.हिंगोली), सना शेख सलीम (२५ वर्षे रा.कुरुंदा ता.वसमत), अंकुश पारवे (५५ रा.इंजेगाव), अनुराग बचाटे (५० रा.धामणी), हनुमान राघोजी कुडे (३० वर्ष रा.कवडा ताक़ळमनुरी), दिगंबर मारोतराव घोगरे (५५ रा. सुपा ता गंगाखेड), गणेश गोविंदराव मोठे (२४ रा.भुजबळ सावंगी ता. हिंगोली), नूरजहा बेगम खाना बेगम (४० राग़ंगाखेड), गुलनाज बेगम खाजा बेगम (४० राग़ंगाखेड), शहाणाज मिर्झा (२१ राग़ंगाखेड) जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच महामंडळाचे वरीष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी भेट देवून नागरीकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले़ जखमी प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी सैफ भैय्या चाऊस, बाबा खान, गौस भाई, खलील भाई, जमील भाई जेसीबी वाले, जहीर भाई, अखिल, उद्धव शिंदे, पीएसआय गडदे, पिएसआय माधव ईजळकर आदी उपस्थित होते़ अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही़ अपघातानंतर घटनास्थळी नागरीकांची मोठी गर्दी जमा झाली होती़

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या