39.1 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeपरभणीसामान्य ज्ञान परीक्षेत १६७८ विद्यार्थ्यांचा सहभाग

सामान्य ज्ञान परीक्षेत १६७८ विद्यार्थ्यांचा सहभाग

एकमत ऑनलाईन

पूर्णा : वाढत्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या काळात मुलांचा पुस्तके वाचण्यात रस निर्माण व्हावा तसेच महापुरूषांचे असामान्य कार्य समजून घ्यावे या हेतूने आ.डॉ.रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळ व मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीने पूर्णा तालुक्यातील ताडकळस, फुलकळस, देऊळगाव आणि गणपूर केंद्रातील ४२ शाळेत  सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन केले होते. यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने तब्बल १६७८ मुला-मुलींनी सहभाग घेतला.

प्रत्येक शाळेत भेट पथकाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. परीक्षेचे औचित्य साधून अनेक मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी यांनी अतिशय बोलक्या प्रतिक्रिया नोंदविल्या. स्पर्धा परीक्षा उपक्रमाचे आयोजन, मित्रमंडळाचे जिल्हा संपर्क प्रमुख संदीप माटेगावकर यांनी केले होते. परीक्षा यशस्वी करण्यासाठी केंद्रप्रमुख डॉ.सिध्दार्थ मस्के, प्रभु मोरे, संजय कांबळे, विनोदकुमार कनकुटे यांच्यासह सर्व मुख्याध्यापक, शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

यावेळी मित्रमंडळाचे युवक अध्यक्ष मारोती आण्णा मोहिते, माऊली रूद्रवार, पिंटू घोडके, नागनाथ खुळखुळे, मदनराव अंबोरे, फलकळस पशुपती शिराळे, अल्पसंख्याक तालुका उपाध्यक्ष ईस्माईल शेख, तालुका प्रसिध्दी प्रमुख दत्तराव पौळ यांच्यासह अनेक पदधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या