32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home परभणी बिनविरोध ग्रामपंचायतीस १७८ लाखांचा निधी

बिनविरोध ग्रामपंचायतीस १७८ लाखांचा निधी

एकमत ऑनलाईन

गंगाखेड : ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020 मध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायतीस आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी गावातील मतदान संख्येनुसार प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून विकास निधी घोषित केला होता. बिनविरोध ग्रामपंचायतीस प्रोत्साहनपर बक्षीस विकास निधीचा पहिल्या टप्प्याचे वितरण पालम येथे घेण्यात आलेल्या सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये करण्यात आले.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2020 21 मध्ये गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील एकूण 187 ग्रामपंचायती निवडणूका होऊ घातल्या होत्या. यापैकी 25 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील 10, पालम तालुक्यातील 8 व पूर्णा तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीचा समावेश होतो. गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील बिनविरोध ग्रामपंचायतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये गंगाखेड तालुक्यातील ग्रा.पं. देवकतवाडी, गोदावरी तांडा, गौळवाडी, कातकरवाडी, तांदुळवाडी येथे सभामंडप बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी 11 लक्ष, डोंगरपिंपळा येथे सभामंडप बांधकामाकरिता 21 लक्ष व खादगाव येथे सभामंडप बांधकाम करणे 25 लक्ष रुपये तसेच पालम तालुक्यातील ग्रा. पं. खुरलेवाडी, दुटका, गुंज व खरी येथे सभामंडप बांधकामाकरिता प्रत्येकी 11 लक्ष तर वाडी येथे सभामंडप बांधकामास, पूर्णा तालुक्यातील मौजे ग्रामपंचायत बरबडी, ईटलापुर माळी व रुंज येथे सभामंडप बांधकामाकरिता प्रत्येकी 11 लक्ष रुपये निधी स्थानिक आमदार विकास निधी मधून आ. गुट्टे यांनी दिला. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बिनविरोध ग्रामपंचायतीस प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून पहिल्या टप्प्यात 14 बिनविरोध ग्रामपंचायतीस 178 लक्ष रुपये एवढा स्थानिक आमदार विकास निधी देऊन निवडणुकीत दिलेला शब्द आ.डॉ. गुट्टे यांनी पाळला. दुस-या टप्प्यातील उर्वरित 11 बिनविरोध ग्रामपंचायतीस 121 लक्ष रुपये विकास निधी देण्यात येणार असल्याचे आ. गुट्टे यांनी सांगितले.

खबरदार! अफवा पसरवाल तर थेट कारवाई :डॉ. विपीन

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या