33.7 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home परभणी रॅपीड टेस्टमध्ये २६ व्यापारी पॉझीटीव्ह

रॅपीड टेस्टमध्ये २६ व्यापारी पॉझीटीव्ह

एकमत ऑनलाईन

परभणी : शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील १३ केंद्रावर ९२२ व्यापा-यांची रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात निगेटीव्ह ८९६ तर २६ जण पॉझिटीव्ह आढळले. महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सिटी क्लब येथे 59 जणांची तपासणी करण्यात आली. कल्याण नगरातील आयएमए हॉल येथे 69 जणांची तपासणी करण्यात आली तेथे त्या ठिकाणी 6 जण पॉझीटीव्ह आढळले. नानलपेठ येथील बाल विद्या मंदिरात 66 जणांची तपासणी करण्यात आली.

त्यात 1 जण पॉझीटीव्ह आढळले. खानापूर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात 73 जणांची तपासणी करण्यात आली. तेथे 2 जण पॉझीटीव्ह आढळले. मार्केट कमिटी येथे 97 जणांची तपासणी करण्यात आली. 1 जण पॉझीटीव्ह आढळले. अपना कॉर्नर येथील वाचनालयात 100 जणांची तपासणी करण्यात आली तेथे 2 जण पॉझीटीव्ह आढळले. नुतन विद्यालयात 50 जणांची तपासणी करण्यात आली. 3 जण पॉझीटीव्ह आले. औषधी भवनात 82 जणांची तपासणी करण्यात आली. तेथे 2 जण पॉझीटीव्ह आढळले. जागृती मंगल कार्यालयात 94 जणांची तपासणी केली. तेथे 1 जण पॉॅझीटीव्ह सापडला.

जायकवाडी येथील आरोग्य केंद्रात 50 जणांची तपासणी करण्यात आली तेथे 4 जण पॉझीटीव्ह आढळले. साखला प्लॉट प्राथमिक आरोग्य केंद्रात 63 जणांची तपासणी करण्यात आली. तेथे 3 जण पॉझीटीव्ह आढळले. कोठारी कॉम्प्लेक्स येथे 47 जणांची तपासणी करण्यात आली तेथे 1 जण पॉझीटीव्ह आढळले. खंडोबा बाजार येथील मनपाच्या आरोग्य केंद्रात 72 जणांची तपासणी करण्यात आली. कोरोना विषयी लक्षणे दिसून येत असल्यास नागरिकांनीही महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सेंटरवर तपासणी करण्याचे आवाहन आयुक्त देविदास पवार यांनी केले आहे.

या सेंटरवर डॉ.अजित जगताप, शुभम राठोड, रेणुका मुराडी, डॉ.अक्षय जाधव, दिलीप बनसोडे, संध्या उबाळे, डॉ.सुशांत लंगडे, गजानन पुरी, सुनिता जोंधळे, डॉ.सिध्देश्‍वर केंद्रे, सय्यद युनुस, समिना बेगम, डॉ.मनोज धामणे, अमोल नवघरे, राजेश इंगोले, डॉ.ऋषीकेश चाळक, गणेश सोलंके, सोनाली पाचघरे, विद्या कांबळे, डॉ.राधा गिराम, वैजनाथ कदम, काशीनाथ देशमुख, अनिता काळे, डॉ.रुपाली महाले, जयेंद्र गायकवाड, निमर्ला टाले, ज्योती ठाकूर, डॉ.आयशा समरीन, निता निळकंठे, मैनाबाई तिप्पलवाड, डॉ.आरती देऊळकर, मनिषा सावणे, तृतीया देशमुख, डॉ.सुनिल उन्हाळे, अब्दुल रहेमान, बी.बी.राठोड, डॉ.ताई ढोबळे, ऋषीकेश फड, रूबीना खान पठाण, डॉ.ऋतुजा मगर, ज्ञानेश्‍वर मोरे, नरेंद्र श्रीवास, कोठारी कॉम्प्लेक्स येथे डॉ.सुनिता राठोड, शेख आजम, ज्योती सूयर्वंशी, रुमान शेख यांनी तपासणी केली.

एमपीएससी परीक्षा केंद्र बदलासाठी विद्यार्थी न्यायालयात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या