22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeपरभणीमानवत मंडळात २८ मिलिमिटर पावसाची नोंद, नाल्यांना पूर

मानवत मंडळात २८ मिलिमिटर पावसाची नोंद, नाल्यांना पूर

एकमत ऑनलाईन

मानवत : तालूक्यात वादळी वारे व मान्सूमपूर्व पावसामुळे मंडळात २८ मिलिमिटर जोरदार पाऊस झाल्याने सावरगाव फिटर मधिल वीज वितरण कंपनीचे वीजेचे खांब कोसळले. त्यामूळे ग्रामीण भागातील सावरगांव, बोंदरवाडी, पिंपळा, नागरजवळा, सावळी आदी गावांचा विद्यूत पूरवठा खंडीत झाला होता. तीन दिवसानंतर ग्रामिण भागातील वीज पूरवठा सूरळीत झाला असून नागरीक समाधान व्यक्त करीत आहे. दरम्यान जोरदार पावसाने परीसरातील नदी नाल्यांना पूर आला होता.

मानवत तालूक्यात वादळी वारे व मान्सूम पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ग्रामीण भागातील अनेक नदी- नाले तूडूंब भरून वाहीले. तर वादळी वारे व विजेचा गडगडाटामूळे ग्रामीन भागातील फिटरमधे अनेक विजेचे खांब कोसळले. त्यामूळे ग्रामिण भागात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. तालूक्यातील मानवत मंडळात २८ मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान ग्रामिण भागात तीन दिवसानंतर ग्रामिण भागाचा विज पूरवठा सूरळीत करण्यात आला आहे. वीज पूरवठा सूरळीत केल्याने ग्रामिण भागातील नागरीकामधून समाधान व्यक्त केल्या जात आहे.

कोरोनाला ब्रेक लागल्याने कंधार मधील कोवीड सेंटर बंद

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या