22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीस्वारातीम विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी ३३ एकर जागा मंजूर

स्वारातीम विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी ३३ एकर जागा मंजूर

एकमत ऑनलाईन

परभणी : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या परभणी येथील उपकेंद्राच्या उभारणीसाठी राज्य सरकारने १३ हेक्टर ०७ आर (३३ एकर) शासकीय गायरान जमीन उपलब्ध करून दिली आहे. परभणी शहरालगत मौजे जांब शिवारातील ही जमीन आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी नांदेड विद्यापीठाच्या कुलसचिवांना नुकताच आदेश निर्गमित केला आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडर विद्यापीठाचे उपकेंद्र परभणीत स्थापन व्हावे, यासाठी वर्षानुवर्षे प्रयत्न सुरु होते. सध्या विद्यापीठाचे उपकेंद्र परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत आहे. परंतु, तेथील जागा अपुरी आहे. त्यामुळे या उपकेंद्रासाठी प्रशस्त जागा मिळावी, असे प्रयत्न सुरु होते. त्या पार्श्वभूमीवर परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने विशेषत: जिल्हाधिकारी गोयल यांनी पुढाकार घेवून विद्यापीठाला ३३ एकर जागा उपलब्ध करून दिली आहे.

या उपकेंद्रामुळे अनेक शैक्षणिक संकुलासह कार्यालयीन कामकाज परभणी येथे चालू करण्यात येईल. विद्यापीठाच्या कामासाठी परभणी येथील विद्यार्थ्यांना नांदेड विद्यापीठामध्ये जाण्याची गरज पडणार नाही. शैक्षणिक संकुले आणि प्रशासकीय कामकाज ३३ एकरमध्ये लवकरच भव्य अशा इमारतीमध्ये सुरू करण्यात येईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या