26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeपरभणीपरभणीत जिल्ह्यात ४ लाख तिरंगा ध्वज

परभणीत जिल्ह्यात ४ लाख तिरंगा ध्वज

एकमत ऑनलाईन

परभणी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणा-या हर घर तिरंगा अभियानात जिल्ह्यातील ४ लाख नागरिक सहभागी होवून स्वच्छेने तिरंगा ध्वज उभारतील असा विश्वास जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते़ जिल्हास्तरीय कार्यान्वय समितीचे सदस्य सचिव जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संदीप घोन्सिकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक रश्मी खांडेकर यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाल्या की, हर घर तिरंगा या अभियानात जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी व्हावे तसेच आपल्या घरावर तिरंगा फडकवावा. सर्वांनी ध्वज संहितेचे पालन करावे. कुणी त्याचे उल्लंघन केल्यास त्याबाबत प्रशासनास कळवावे. तसेच जिल्ह्यातील शासकीय – निमशासकीय कार्यालय, शाळा- महाविद्यालय, ग्रामपंचायत, महानगर पालिका, नगर पंचायत, विविध संस्थाच्या कार्यालयावर राष्ट्रध्वज डौलाने फडकवावा यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत नियोजन करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी ३ लाख तर शहरी भागासाठी १ लाख असे एकूण ४ लाख झेंडे जिल्ह्यात फडकविण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने निश्चित केले आहे. नागरिकांना आपल्या घरावर झेंडा फडकविण्यासाठी राष्ट्रध्वज उपल्बध व्हावा याकरीता जिल्ह्यात विविध ठिकाणी विक्री केंद्र सुरु करुन माफक दरात राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्याचे प्रशासनामार्फत नियोजन करण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या