24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeपरभणीशिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उस्मानाबादहून 4 हजार मावळे जाणार

शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उस्मानाबादहून 4 हजार मावळे जाणार

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : 6 जून रोजी दरवर्षी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत असतो. या सोहळ्यासाठी राज्यासह देशभरातून 5 ते 6 लाख शिवभक्त सहभागी होतात. उस्मानाबाद येथील शिवराज्याभिषेक सोहळा समिती गेल्या 20 वर्षापासून या सोहळ्यात सहभागी होत आहे. यावर्षी जिल्ह्यातून साडेतीन ते चार हजार मावळे जाणार असून सोहळा संपल्यानंतर येथील 800 मावळ्यांचे पथक परिसराची स्वच्छता करणार आहे, अशी माहिती शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष शशिकांत खुने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उस्मानाबाद शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात शनिवारी दि. 28 मे रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीची पत्रकार परिषद झाली. यावेळी ही माहिती देण्यात आली. यावेळी ऍड. प्रशांत जगदाळे, रवी मुंडे, कंचेश्वर डोंगरे, दत्तात्रेय साळुंके, गौरव बागल, गुंडोपंत जोशी आदी उपस्थित होते. अधिक माहिती देताना शशिकांत खुने म्हणाले की, रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्याची प्रथा उस्मानाबादकरांनी 20 वर्षापुर्वी चालू केली. त्यानंतर युवराज छत्रपती संभाजीराजे मोठ्या प्रमाणात सोहळा साजरा करण्यास सुरूवात केली.

यावर्षीचा शिवराज्याभिषेक सोहळा युवराज छत्रपती संभाजीराजे व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होत आहे. धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची, जागर शिवशाहीरांचा, स्वराज्याच्या इतिहासाचा, व सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा, हे कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण असणार आहेत. सोहळा संपन्न करण्यासाठी विविध 40 समित्या तयार करण्यात आलेल्या आहेत. यापैकी स्वच्छता समितीची जबाबदारी उस्मानाबादकरांनी घेतली आहे. रायगडावर सोहळा संपन्न झाल्यानंतर परिसराची स्वच्छता उस्मानाबादचे 800 टिशर्ट घातलेले मावळे करणार आहेत. या सोहळ्यासाठी 250 ते 300 गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून जवळपास साडेतीन ते चार हजार मावळे सोहळ्यासाठी जाणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या