28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeपरभणीउत्कृष्ट काम करणा-या आशाताई, गटप्रवर्तकांचा गौरव

उत्कृष्ट काम करणा-या आशाताई, गटप्रवर्तकांचा गौरव

एकमत ऑनलाईन

परभणी : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन अमृत महोत्सव कार्यक्रम आणि स्वच्छता ही सेवा मोहिमेंतर्गत आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणा-या आशाताई आणि गटप्रवर्तकांचा गौरव जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-या आशाताई आणि गटप्रवर्तक यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन जिल्हा परिषदेमध्ये करण्यात आले होते. याप्रसंगी सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ़संजीवकुमार पांचाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़रावजी सोनवणे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विद्यासागर पाटील, प्रसिद्धी प्रमुख कैलास सोमवंशी आदी उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते उपस्थित आशाताई आणि गटप्रवर्तक यांचा गौरव करण्यात आला.

या प्रसंगी टाकसाळे म्हणाले की, आशाताईंच्या आरोग्य विषयक कार्याचे कौतुक व्हावे आणि त्यांचे ऋण व्यक्त करता यावे म्हणून या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे टाकसाळे यांनी सांगितले़ आरोग्य क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी बजावल्याबद्दल कौतुकाची थाप मिळावी म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येक तालुक्यातील पाच आशाताईंचा जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला. अधिकारी व कर्मचा-यांनी घेतली स्वच्छतेची शपथ़ केंद्र व राज्य शासनाच्या वतीने सुरू असलेल्या स्वच्छता ही सेवा मोहिमेंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये आशाताई पर्यवेक्षिका यांच्यासह अधिकारी आणि कर्मचा-यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माधव चिवळे, ज्ञानेश्वर उदावंत यांनी प्रयत्न केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या