30.6 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home परभणी वडगाव सुक्रेत दोनशे रूपयांच्या ४८ बनावट नोटा जप्त

वडगाव सुक्रेत दोनशे रूपयांच्या ४८ बनावट नोटा जप्त

एकमत ऑनलाईन

परभणी : पोलीस अधिक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने दैठणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव सुक्रे (ता. परभणी) येथे बनावट नोटा देवून लोकांची फसवणूक करणा-या ४ जणांना सोमवारी रात्री रंगेहात ताब्यात घेतले. वडगाव सुक्रे येथे सोमवारी रात्री काही व्यक्ती दोनशे रुपयांच्या बनावट नोटा लोकांना देवून फसवणूक करत असल्याची माहिती विशेष पथकाचे फौजदार विश्वास खोले, चंद्रकांत पवार यांना मिळाली.

या माहितीवरून कर्मचारी राहुल चिंचाने, सुग्रीव केंद्रे, शंकर गायकवाड़, यशवंत वाघमारे, दीपक मुदिराज, विष्णु भिसे, धरने यांनी वडगाव सुक्रेत धाव घेतली. यावेळी ३ जण २०० रुपयांच्या बनावट नोटा जाणीवपूर्वक लोकाना देत असल्याचे आढळून आले. पथकाच्या अधिकारी, कर्मचा-यांनी संबंधितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २०० रूपयांच्या ४८ बनावट नोटा जप्त केल्या. अधिक चौकशी केली असता त्यांनी माजलगाव येथील एका व्यक्तिकडून नोटा आल्याची माहिती पथकास दिली. पथकाने तातडीने हालचाली करत माजलगाव येथून आणखी दोघाना ताब्यात घेतले. त्यात एक अल्पवयीन असल्याचे पोलिसानी म्हटले आहे.

या प्रकरणी राहुल चिंचाने यानी दैठणा पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारिवरुन बनावट नोटा बाळगुन त्या जाणीवपूर्वक लोकाना देत त्यांची फसवणूक करणा-या सय्यद फीरोज, मारोती सालुंके,भागवत शिंदे, नुर मोहम्मद हाशम अतार (रा.सर्व माजलगाव) यांच्यासह अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून ४८ बनावट नोटा तसेच एक मोटरसायकल जप्त केली असल्याचेही फिर्यादित नमूद करण्यात आले. अधिक तपास फौजदार श्री.आदोड़े करीत आहेत.

ऊसदरासाठी जनहितच्या कार्यकर्त्यांनी युटोपियनच्या गव्हाणीमध्ये टाकल्या उडया

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या