23 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeपरभणीयेलदरीत ५३.९६ तर निम्न दुधना प्रकल्पात ५७.९९ टक्के पाणीसाठा

येलदरीत ५३.९६ तर निम्न दुधना प्रकल्पात ५७.९९ टक्के पाणीसाठा

एकमत ऑनलाईन

परभणी: परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ५३़९६ टक्के तर निम्न दुधना प्रकल्पात ५७़९९ टक्के पाणी साठा शिल्लक असून सर्वात कमी पाणीसाठा करपरा मध्यम प्रकल्पात १३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़. त्यामुळे यावर्षी तरी परभणी जिल्ह्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

परभणी जिल्ह्यात मोठे, मध्यम व लघु प्रकल्पात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुरेसा पाणी साठा शिल्लक असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यात छोटे मोठे ११ प्रकल्प आहेत़ जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात सरासरीच्या ९६़२ टक्के पाऊस झाला आहे़ जिल्ह्यात सद्यपरिस्थितीत प्रकल्पात पुरेसा पाणी पुरवठा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

येलदरी प्रकल्पात ५३़९६ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात ५७़९९, झरी (मानवत) प्रकल्पात ७४़००, करपरा मध्यम प्रकल्पात १३, मासोळी प्रकल्पात २६, ढालेगाव बंधा-यात ४६़४२०, तारू गव्हाण बंधा-यात ५२़६५०, मुदगल बंधा-यात ६४़६४०, मुळी बंधा-यात ९़४४ तर डिग्रस बंधा-यात २८़१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या